18 December 2024 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; सरकारी कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, दरमहा 1,80.000 रुपये पगार मिळेल Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 1 लाखावर 40 काेटी परतावा - BOM: 530305 NHPC Share Price | एनएचपीसी शेअर मल्टिबॅगर परतावा देणार, CLSA ब्रोकरेजने दिले संकेत, टार्गेट नोट करा - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 8 लाखांपर्यंत परतावा, फायद्याच्या योजनेचा लाभ घ्या EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरसाठी तज्ज्ञांकडून रेटिंग, चार्टवर ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

Mutual Fund | म्युचुअल फंड लाईफ बना देगा! फक्त 100 रु प्रतिदिन गुंतवून अणि 20 लाख परतावा, नफ्याचा गणित पहा

Mutual fund

Mutual fund| आजकाल वाढत्या महागाईमुळे लोकांनी बँकांच्या बचत योजनाकडे पाठ फिरवली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. बचत खाती, एफडी आणि बँकांच्या मुदत ठेव खात्यांवर मिळणारे तुटपुंजे व्याज आपल्याला काहीच फायदा मिळवून देत नाही. अशा स्थितीत पैसे गुंतवायचे कुठे? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाला असणार. गुंतवणूक बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमवायचा असेल तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरू शकते.

लाखोंचा परतावा कमवा :
रोजगाराच्या अपुऱ्या संधी, महागाई आणि तुटपुंजे वेतन यामुळे आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आपल्या बचतीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे ही आता काळाची गरज बनली आहे. जर तुम्ही दररोज 100 रुपये बचत केली तर एका महिन्यात तुमच्याकडे 3000 रुपये जमा होतात. हे पैसे जर तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंड योजनेच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवले तर दीर्घकाळात तुम्हाला अप्रतिम परतावा मिळू शकतो. बंपर परतावा हवा असेल तर तुम्हाला म्युचुअल फंड गुंतवणूक किमान 15 वर्षांसाठी करावी लागेल. सध्या गुंतवणूक बाजारात अनेक म्युच्युअल फंड स्कीम उपलब्ध आहेत, ज्यांनी 15 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 15-25 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्हाला याच दराने परतावा मिळाला तर 15 वर्षांनंतर तुम्हाला 20 लाख रुपये सहज मिळू शकतात.

गुंतवणुक करण्याचे सूत्र :
समजा जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला 3000 रुपये जमा करायला सुरुवात केली आणि त्याचा कालावधी 15 वर्षांसाठी निश्चित केला असेल, तर तुम्ही 20 लाख रुपये सहज मिळवू शकता. जर तुम्ही एक हिशोब केला तर तुम्हाला समजेल की, 15 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 5.40 लाख रुपये झाली असेल. जर तुमच्या म्युचुअल फंडची कामगिरी चांगली असेल तर 15 वर्षानंतर दीड तुमच्या एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य 20 लाख रुपयेपेक्षा जास्त झाले असेल. म्हणजेच तुम्हाला किमान 14.60 लाख रुपये परतावा मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो.

एसआयपी मधील परतावा :
म्युचुअल फंड तज्ञांच्या मते, सध्याच्या युगात, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करून उच्च परतावा कमवायचा असेल तर एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे चांगली सरासरी मिळते आणि पैसे बुडण्याच्या धोका फार कमी होतो. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास तुम्हाला उत्तम परतावा देखील मिळतो.

म्युचुअल फंडांची उत्कृष्ट कामगिरी :
जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याचे चार्ट पाहिले तर आपल्याला समजेल की, अशा अनेक म्युचुअल फंड योजना आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 15 वर्षांत 15-20 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात कधीही गुंतवू नका. जर तुम्ही SIP मध्ये 3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या म्युचुअल फंडांमध्ये गुंतवा. ह्याने तुमचे जोखीम विभागले जाईल, आणि कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही.

SIP गुंतवणूक वैशिष्ट :
समजा जर तुम्ही म्युचुअल फंड SIP मध्ये 15 वर्षांसाठी 3000 रुपये गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल, आणि तुम्हाला अचानक काही आर्थिक अडचणी आल्या किंवा वैयक्तिक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले तर अशा वेळी तुम्ही SIP गुंतवणूक हवी तेव्हा थांबवू शकता. यावर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही पुन्हा SIP मध्ये पैसे जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund Investment Benefits of SIP check details on 12 November 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x