21 April 2025 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Mutual Fund Investment | 3-5 वर्षांसाठी म्युचुअल फंडातून खूप पैसा हवा आहे का? मग 70:30 फॉर्म्युला समजून घ्या, फंडांची लिस्ट

Mutual fund Investment

Mutual Fund Investment | जर तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवायचा असेल, मात्र कोणता म्युचुअल फंड निवडावा माहीत नसेल तर तुमच्यासाठी आम्ही या लेखात भरपूर माहिती घेऊन आलो आहोत, जी तुमच्या कामाला येईल. कोणते म्युचुअल फंड चांगले आहेत, आणि तुमचा पोर्टफोलिओ कसा असावा, हे आम्ही आज या लेखात सांगणार आहोत. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारासाठी सकारात्मक संकेत येत आहेत. देशातील जीएसटी संकलनही सकारात्मक दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.1 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशातील कॉर्पोरेट कामगिरी सकारात्मक दिसत आहे. मात्र, वाढती महागाई आणि वाढती व्यापार तूट, आणि जागतिक आर्थिक मंदीचे संकेत यांनी थोडी चिंता वाढवली आहे. युक्रेनवरील हल्ल्याचा नकारात्मक परिणामही जगभरात दिसून येत आहे.

गुंतवणूक धोरण :
जागतिक आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत असताना दीर्घ गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवणे तुमच्यासाठी कधीही फायदेशीर राहील. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकदार शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करू शकतात. गुंतवणुकीच्या धोरणाबद्दल बोलायचे झाल्यास, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी फंड आणि डेट फंड आहे दोन्ही प्रकार ठेवा. शेअर मार्केट मधून तुमचे उत्पन्न कमी असेल तर, डेट म्युच्युअल फंड, पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि मुदत ठेवींमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. जर तुम्ही उच्च उत्पन्न गटात मोडत असाल तर तुमच्यासाठी डेट फंड हा योग्य गुंतवणूक पर्याय राहील.

3-5 वर्षांचा पोर्टफोलिओ कसा तयार करावा?
गुंतवणूक तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओतील 80 टक्के रक्कम इक्विटी फंडात गुंतवणूक करा. 20 टक्के रक्कम डेट फंडात गुंतवणूक करा. जर तुम्ही 3-5 वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर,70 टक्के रक्कम इक्विटी फंडात गुंतणूक करा आणि 30 टक्के रक्कम डेट फंडात गुंतवा.

SIP मध्ये नियमित गुंतवणुक करा :
म्युचुअल फंड तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे की, एकदा जर का तुम्ही म्युचुअल फंडमध्ये SIP गुंतवणूक सुरू केली की, ती दीर्घकाळासाठी चालू ठेवा. जर तुमच्याकडे मोठी रक्कम शिल्लक असेल तर तुम्ही म्युचुअल फंडमध्ये एकरकमी गुंतवणूक करू शकता. दरवर्षी एसआयपी गुंतवणूक किमान 10 टक्के वाढवत राहा. बाजारातील अस्थिरता येत जात राहील, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. शेअर बाजार पडला म्हणून गुंतवणूक थांबवू नका. याशिवाय वर्षातून किमान दोनदा तरी पोर्टफोलिओची तपासणी करा.

तज्ञांचे आवडते म्युचुअल फंड :
1) एबीएसएल स्मॉल कॅप फंड
2) कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप फंड
3) डीएसपी इक्विटी समोर. फंड
4) डीएसपी मिडकॅप फंड
5) फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड
6) एचडीएफसी फ्लेक्सिकॅप फंड
7) इन्वेस्को इंडिया मल्टीकॅप फंड
8) कोटक इमर्जिंग इक्विटी फंड
9) एसबीआय कॉन्ट्रा फंड
10) एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund Investment opportunities for long term benefits and high returns on 31 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund Investment(199)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या