19 November 2024 4:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Top Mutual Fund | खूप पैशाच्या नोटा हव्या तर या 5 म्युच्युअल फंड योजनांची नावं नोट करा, 10 हजारावर 6 ते 36 लाख परतावा मिळतोय

Top Mutual Fund

Top Mutual Fund | गुंतवणूक बाजाराविषयी तुम्ही लोकांना बरेचदा बोलताना एकले असेल की, गुंतवणूक जेवढी जुनी असेल तितकाच जास्त लागावा कमावून देईल. तुम्ही सध्या जर एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही योजना निवडल्या आहेत.

या जुन्या योजनेचा रिटर्न चार्ट पाहिला तर तुम्हाला लगेच समजेल की, तुम्ही या गुंतवणुकीतून चांगला परतावा कमवू शकता. काही जुन्या म्युचुअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा कमावून दिला आहे. भारतातील सर्वात पहिला म्यूचअल फंड 1986 मध्ये सुरू झाला होता. 1986 ते 1993 दरम्यान इतर 9 म्युचुअल फंड लॉन्च झाले होते. या सर्वांनी आतपर्यंत मजबूत परतावा मिळवून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 5 म्युच्युअल फंड बद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी गेल्या 28 ते 35 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 368 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. म्युच्युअल फंड मार्केटमधील 5 सर्वात जुन्या योजनाविषयी जाणून घेऊ…

UTI Mastershare Fund :
* ही म्युचुअल फंड योजना 18 ऑक्टोबर 1986 रोजी लॉन्च झाली होती.
* लॉन्च झाल्यानंतर या योजनेने 17.70 टक्के सरासरी वार्षिक परतावा दिला आहे.
* या योजनेत 10 हजारांच्या गुंतवणूक केलेल्या लोकांना आता 36.80 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

Canara Robeco Equity Tax Saver Fund :
* लॉन्च झालेली तारीख: 31 मार्च 1993
* लॉन्च झाल्यानंतर रिटर्न : 15.31टक्के वार्षिक
* 10 हजार गुंतवणुकीवर परतावा : 6.5 लाख रुपये

SBI Magnum Equity ESG Fund :
* लॉन्च झालेली तारीख : 1 जानेवारी 1991
* लॉन्च झाल्यानंतर रिटर्न : 15.17 टक्के वार्षिक
* 10 हजार गुंतवणुकीवर परतावा : 16 लाख रुपये

Tata Large & Mid Cap Fund :
* लॉन्च झालेली तारीख : 31 मार्च 1993
* लॉन्च झाल्यानंतर रिटर्न : 12.80 टक्के वार्षिक
* 10 हजारांच्या गुंतवणुकीचे मूल्य : 3.75 लाख

SBI Large & Midcap Fund :
लॉन्च झालेली तारीख : 28 फेब्रुवारी 1993
लॉन्च झाल्यानंतर रिटर्न : 14.77 टक्के वार्षिक
* 10 हजारांच्या गुंतवणुकीचे मूल्य: 6.25 लाख

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund Scheme for Investment and return in long term in 20 March 2023.

हॅशटॅग्स

Top Mutual fund(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x