15 January 2025 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा पर्याय सध्याच्या काळात लोकप्रिय गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक महत्त्वाचा आणि सर्वाधिक परतावा मिळवून देणारा पर्याय ठरला आहे. एसआयपी, म्युच्युअल फंड यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटते.

तसं पाहायला गेलं तर शेअर बाजारात देखील गुंतवणुकीची चांगली कॉम्पिटिशन रंगली आहे. परंतु जे गुंतवणूकदार शेअर बाजारातील तोट्याचा सामना करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड योजना उत्तम आहेत. तुम्ही एसआयपीमध्ये पद्धतशीर गुंतवणूक करून दीर्घकाळात मोठा कॉर्पस तयार करू शकता. तुमच्यापैकी बरेचजण एसआयपीमध्ये गुंतवणूक तर करत असतील परंतु SIP चे योग्य नियम ठाऊक नसल्यामुळे तुम्हाला लवकर हाईक मिळत नाही. जाणून घ्या योग्य गुंतवणुकीची योग्य पद्धत.

योग्य पद्धतीने गुंतवणूक करा :

एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा एकमेव नियम तो म्हणजे शिस्त. तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने SIP म्युच्युअल फंडमध्ये नियमित स्वरूपात गुंतवणूक केली तर, याचा मोठा फायदा तुम्हाला अनुभवता येतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये सरासरी वार्षिक परतावा 12% ने दिला जातो.

व्याजदराची टक्केवारी सर्वाधिक असल्यामुळे तुम्ही एसआयपीमध्ये सातत्य ठेवलं तर, लवकरात लवकर तुमच्याजवळ मोठा फंड तयार होईल. त्यामुळे एसआयपी कोणत्याही कारणांमुळे मध्येच थांबवू नका. कारण की ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असेल त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात 100 पटीने मिळणार.

मोठी गुंतवणूक करण्याची काही गरज नाही :

एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा प्लॅन नावाप्रमाणेच अतिशय सिस्टिमॅटिक आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कधी पैशांची बचत देखील करू शकता. काही लोक लोभापोटी किंवा लवकरात लवकर फंड मोठा होण्यासाठी जास्त पैशांची गुंतवणूक करतात आणि काही कारणांमुळे एसआयपी मध्येच थांबते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या कॉर्पसवर होतो.

एसआयपीमध्ये टॉप-अप करणे अत्यंत महत्त्वाचे :

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये टॉप-अप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टॉप-अप म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षाला पाच टक्के किंवा दहा टक्के रक्कम दरवर्षी वाढवायची असते. असं केल्याने तुम्हाला थोडा थोडा प्रमाणात मोठा फंड तयार करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP Friday 13 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(258)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x