18 November 2024 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Mutual Fund SIP | गुंतवणूक करा आणि चिंता सोडा, आपल्या कन्येच्या उज्वल भविष्यासाठी 17 लाख रुपयांचा परतावा मिळेल

Mutual fund SIP

Mutual fund SIP | इक्विटी मधील मिडकॅप आणि लार्जकॅप फंडांच्या तुलनेत स्मॉलकॅप म्युच्युअल फंडमध्ये जबरदस्त जोखीम असते असे मानले जाते. घरात मुलीचा जन्म झाला की तिच्या पालकांना तिच्या भविष्याची चिंता सतावू लागते. सर्व पालक आपल्या कन्येच्या लग्नासाठी पैसे साठवण्याचा विचार करू लागतात. या महागाईच्या काळात त्यांची काळजी आणखीनच वाढते. त्यामुळे स्मार्ट पद्धतीने आणि अधिक हुशारीने पैसे गुंतवणे आणि नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.

जर तुम्हाच्याकडेही कन्यारत्न असेल आणि तुम्हाला तिच्या लग्नाची काळजी सतावत असेल तर, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आम्ही या लेखात तुम्हाला अश्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नापर्यंत भरघोस रक्कम जमा करू शकता. दरमहा फक्त 10,000 रुपये गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात 17.52 लाख रुपये परतावा मिळवू शकता.

क्वांट स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन :
ही म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याची संधी देते. मागील सात वर्षांत, या स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणुकीचे रूपांतर काही वर्षात 17.52 लाख रुपये मध्ये केले आहे. हा फंड जानेवारी 2013 मध्ये लाँच करण्यात आला होता. आणि या फंडने स्थापनेपासून आतापर्यंत गुंतवणूकदारांना तब्बल 229 टक्के परतावा मिळवून दिला आहे. सरासरी वार्षिक आधारावर, या म्युचुअल फंडने तब्बल 13.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

17.52 लाख रुपये परताव्याचा हिशोब :
या म्युच्युअल फंड योजनेने फक्त तीन वर्षांच्या कालावधीत मासिक 10,000 रुपये च्या SIP गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.44 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहेत. ही गुंतवणूक क्वांट स्मॉल कॅप फंड-डायरेक्ट प्लॅनमध्ये पाच वर्षांसाठी केली तर ती आज 11.71 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, या स्मॉलकॅप प्लॅनमध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सात वर्षांसाठी केली तर त्यावर मिळणारा एकूण परतावा हा तब्बल 17.52 लाख रुपये असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund SIP investment for long term benefits on 9 September 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(243)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x