24 November 2024 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Mutual Fund | गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा शक्य आहे, फक्त 1000 रुपये म्युचुअल फंड SIP करा आणि हे गणित फॉलो करा

Mutual Fund

Mutual Fund | सध्याच्या काळात महागाई सोबतच लोकांच्या गरजाही वाढत आहेत आणि आपली जीवनशैलीही दिवसेंदिवस बदलत चालली आहे. या बदलत्या जीवनशैलीच्या काळात आपण पैसे बचत तर केले पाहिजे सोबत सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकही केली पाहिजे. शेअर बाजारात असे म्हणले जाते की गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नसते आणि गुंतवणुकीची योग्य वेळही नसते, तुम्ही ज्या वेळी गुंतवणूक करता, तीच योग्य वेळ असते. तुम्ही अजूनही गुंतवणुक करायला सुरुवात केली नसेल, तर उशीर झालेला नाही. या दिवाळीपासून बिनधास्त गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. आज तुम्ही हजार रुपये गुंतवणूक कराल पण भविष्यात तीच गुंतवणूक करोडो रुपये बनून तुमच्याकडे परत येईल.

गुंतवणूक सुरुवात :
जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी एक चांगली योजना शोधत असाल तर अश्या बऱ्याच योजना बाजारात उपलब्ध आहेत ज्यात तुम्ही 500-1000 रुपये गुंतवणूक आपली गुंतवणूक सुरू करू शकता. आजच्या काळात मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून बचत करण्यास मर्यादा येतात. कितीही प्रयत्न केले तरी आपण महिना अखेर जास्त पैसे बचत करू शकत नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुम्ही छोटी गुंतवणूक करून दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकता. फक्त 1 हजार रुपयांमध्ये तुम्ही म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. म्युचुअल फंडमधे छोटी गुंतवणूक करून दीर्घकाळात तुम्ही मोठा फंड मिळवू शकता.

छोटी गुंतवणूक, मोठा परतावा :
म्युचुअल फंड हा गुंतवणुकीचा असा एक पर्याय आहे ज्यात छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही दीर्घकाळात करोडपती होऊ शकता. चला तर मग जाणून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल. म्युचुअल फंड मध्ये तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये SIP गुंतवणूक करून लक्षाधीश होऊ शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागेल. समजा तुम्ही दरमहा 1000 रुपये जमा करून म्युचुअल SIP सुरू केली, तर तुम्हाला त्यावर दर वर्षी चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जाईल. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर परतावा होत आहे, हे कळण्यास दीर्घ कालावधी जावा लागतो.असे काही म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्केहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

म्युचुअल फंडमध्ये परतावा कसा मिळतो ?
एक उदाहरण पाहूया म्युचुअल फंड आपल्याला कसा परतावा कमावून देतात हे समजून घेऊ. समजा तुम्ही 20 वर्षांसाठी म्युचुअल फंडमध्ये दर महिन्याला 1 हजार रुपये जमा करत असाल तर भविष्यात तुम्हाला किती परतावा मिळू शकतो ह्याचा हिशोब पाहू. जर एखादा गुंतवणूकदार 20 वर्षांसाठी म्युचुअल फंड मध्ये SIP गुंतवणूक करतो तर या कालावधीत त्याची एकूण गुंतवणूक 2.4 लाख रुपये असेल. जर म्युचुअल फंड SIP मध्ये वार्षिक 15 टक्के चक्रवाढ व्याज मिळत असेल तर गुंतवणूकदाराला 20 वर्षात सुमारे 15 लाख 16 हजार रुपये परतावा मिळेल.

जर म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला 20 टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर त्याला वीस वर्षात चक्रवाढ व्याज पद्धतीने 1000 रुपये च्या मासिक गुंतवणुकीवर एकूण 31.61 लाख रुपये परतावा मिळेल. दरमहा 1000 रुपये जमा करून 25 वर्षे नियमित SIP गुंतवणूक केली तर 20 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज दराने मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला 86.27 लाखाचा परतावा मिळेल. जर गुंतवणूकदारांनी 30 वर्षांच्या कालावधीसाठी मासिक एक हजार रुपये SIP गुंतवणूक केल्यास वार्षिक 20 टक्के व्याज दराने गुंतवणूकदाराला 2 कोटी 33 लाख 60 हजारांचा परतावा दिला जाईल. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज परतावा मिळतो. यासोबतच दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते.या पद्धतीने म्युचुअल फंड SIP मध्ये तुम्ही दरमहा छोटी रक्कम गुंतवणूक करून मोठा परतावा कमवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund SIP investment returns and investment benefits on 29 September 2022.

हॅशटॅग्स

#Small Cap Mutual Fund(3)mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x