17 April 2025 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Mutual Fund SIP | ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर ठरतेय, SIP गुंतवणूकीवर 11.27 लाखाचा भरघोस परतावा, योजनेचं नाव नोट करा

Mutual fund SIP, Quant small cap equity mutual fund, SIP,

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही शेअर बजराच्या अधीन असते. म्हणजे शेअर बाजारातील चढ उताराचा परिणाम म्युचुअल फंड मधील गुंतवणुकीवरही होतो. लार्ज कॅप म्युचुअल फंड हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानले जातात, तर स्मॉल-कॅप इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे धोकादायक मानले जाते. परंतु मार्केट तेजीत आला की सर्वाधिक परतावा स्मॉल कॅप इक्विटी फंड देते.

क्वांट स्मॉल-कॅप इक्विटी म्युच्युअल फंड, हा असाच एक फंड आहे जो धोकादायक तर आहे, पण मार्केट तेजीत आला की सर्वात जास्त परतावाही देतो. या इक्विटी फंडाच्या माध्यमांतून गुंतवणूकदारांनी दरवर्षी 35 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला आहे. आणि ह्या म्युचुअल फंडचा बेंचमार्क S&P BSE 250 Smallcap TRI असून त्याने, मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 28.5 टक्के वार्षिक CAGR परतावा मिळवून दिला आहे. क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांच्या कालावधीत परतावा देण्याच्या बाबतीत त्याच्या सर्व पीअर फंडांनाच नव्हे तर श्रेणीतील सर्व फंडाना आणि बेंचमार्कलाही मागे टाकले आहे.मागील तीन वर्षात या म्युचुअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना 54 टक्के वार्षिक या दराने परतावा मिळवून दिला आहे.

तज्ञांचे मत काय?
क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंडावर तज्ञ म्हणतात की, “क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना उच्च परतावा देण्याबरोबरच जोखीम व्यवस्थापन उत्तम प्रकारे केले आहेत. आणि ह्याचा फायदा कंपनी सोबत गुंतवणूकदारांनाही होत आहे. हा म्युच्युअल फंड नकारात्मक जोखीमीचे देखील व्यवस्थापन करतो. जोखीम नियंत्रण आणि उच्च परतावा दर स्थिर ठेवण्यात हा म्युच्युअल फंड यशस्वी झाला आहे”, असे म्युच्युअल फंड तज्ञांचे म्हणणे आहे.

तुम्ही गुंतवणूक करावी का?
या स्मॉल-कॅप इक्विटी म्युच्युअल फंडात आता गुंतवणूक करावी की नाही याविषयी तज्ञांमध्ये दुमत आहेत. “या म्युचुअल फंडात, स्मॉल कॅप इक्विटी शेअर्सचे सध्याचे एक्सपोजर 54 टक्के आहे. मिड कॅपइक्विटी शेअर्सचे सध्याचे एक्सपोजर 25 टक्के आहे. तर कर्ज कॅप शेअर्सचे सध्याचे एक्सपोजर 20 टक्के. जास्त जोखीम किंवा मध्यम जोखीम घेणारे गुंतवणूकदार या म्युचुअल फंडात गुंतवणूक करू शकतात. तसेच, या म्युच्युअल फंडात किमान 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याज पद्धतीने भरघोस परतावा मिळू शकतो. अश्या म्युचुअल फंडमध्ये एकाच वेळी एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केली तर जास्त परतावा कमावता येईल. म्युचुअल फंड बाजारातील तज्ञ म्हणतात की “3 वर्षांच्या कालावधीसाठी 54 टक्के CAGR दरासह, म्युच्युअल फंडांत SIP गुंतवणूक करणे, हा एक योग्य गुंतवणूक पर्याय असू शकतो.

गुंतवणुकीवर परिणाम :
व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड मध्ये 1 लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केली असती, किंवा 10,000 रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केली असती, तर 3 वर्षांत तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 11,27,561 रुपये झाले असते. जेर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक केली असती,तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17,27,159 रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund SIP of Quant small cap equity mutual fund investment opportunities benefits on 20 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या