22 January 2025 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Mutual Fund SIP | कडक! पैसाच पैसा, या म्युच्युअल फंड योजनेने 2.5 कोटी परतावा दिला, तुम्ही सुद्धा SIP करणार का?

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधील जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय आहे. योग्य म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला बंपर परतावा मिळू शकतो. आज आपण या लेखात ICICI प्रुडेंशियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी म्युचुअल फंडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने नुकताच गुंतवणूक बाजारात आपले 18 वर्षे पूर्ण केले आहेत. जर तुम्ही सुरुवातीच्या काळात या म्युचुअल फंड योजनेत 10 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.5 कोटी रुपये झाले असते.

व्हॅल्यू रिसर्च फर्मच्या आकडेवारीनुसार 31 जुलै 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाकडे 24,694 कोटी रुपये व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता होती. या श्रेणीतील एकूण AUM पैकी 30 टक्के या वाटा या फंड हाऊसचा आहे. ही म्युचुअल फंड योजना गुंतवणूक बाजारातील व्हॅल्यू इंवेस्टमेंट पद्धतीचे अनुसरण करते. या योजनेतील पैसे विविध प्रकारच्या स्टॉक्सच्या पोर्टफोलिओमध्ये लावले जातात जे सध्या आकर्षक मुल्यांकनावर उपलब्ध आहेत.

16 ऑगस्ट 2004 रोजी या म्युचुअल फंड योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या स्कीमने वार्षिक आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 19.7 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याऐवजी 10 लाख रुपये निफ्टी-50 इंडेक्समध्ये गुंतवले असते तर, या फंडापेक्षा तुम्हाला 15.6 टक्के CAGR परतावा कमी मिळाला असता. आणि तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून फक्त 1.3 कोटी रुपये झाले असते. जे म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक केल्यास मिळणाऱ्या परताव्यापेक्षा कमी आहे.

ICICI प्रुडेन्शियलच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड :
या म्युचुअल फंड योजनेने एसआयपी गुंतवणुक करणाऱ्या लोकांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. हा फंड सुरू झाला त्यावेळी जर तुम्ही दर महिन्याला 10,000 रुपयांची SIP गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.2 कोटी रुपये झाले असते. या कालावधीत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 21.6 लाख रुपये असती. म्हणजेच तुम्हाला या गुंतवणुकीवर वार्षिक 17.3 टक्के CAGR दराने परतावा मिळाला असता. मागील 7 वर्षांत या योजनेने SIP गुंतवणुकीवर 15.81 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. 5 वर्षांचा SIP चा परतावा 18.97 CAGR होता. आणि गेल्या 3 वर्षांचा SIP परतावा 27.59 टक्के CAGR आहे.

ICICI प्रुडेन्शियल म्युचुअल फंडबद्दल तज्ञ म्हणतात की, “मागील काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांची व्हॅल्यू गुंतवणुकीत आवड मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. गुंतवणूकदार आता जागरूक आणि हुशार झाले आहेत. लोकांना आता गुंतवणुकीचे मूल्य समजले आहे. गुंतवणूकदारांना माहीत आहे की, गुंतवणुकीचे नियम काटेकोरपणे पालन करणे खूप आवश्यक आहे. भारतीयांची खास गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्टीत आपण फायदा पाहतो. यामुळे आपण नेहमी योग्य ठिकाणी गुंतवणूक करून पैसे कमविण्याची प्रयत्न करत असतो.

ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाबद्दल तज्ञ म्हणतात की, गुंतवणूकदारांनी पैसे लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, व्हॅल्यू इंवेस्टमेंट दीर्घकाळात गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून देऊ शकतात. ICICI व्हॅल्यू डिस्कव्हरी म्युचुअल फंड आपले पैसे लावताना नेहमी दीर्घकालीन मजबूत कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund SIP Scheme of ICICI Prudential Value Discovery Fund Investment returns and benefits on 18 November 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(258)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x