16 April 2025 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

Mutual fund SIP-SWP | म्युच्युअल फंड SIP-SWP चे फायदे माहीत आहेत?, SIP गुंतवणुकीवर दरमहा 35000 रुपये मिळतील, जाणून घ्या कसे?

Mutual fund SIP-SWP

Mutual fund SIP-SWP | आजकालच्या महागाई आणि बेरोजगारीच्या काळात, लोकांचे उत्पन्न घटत चालले आहे, आणि बचत करणे अवघड झाले आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतून थोडी फार रक्कम गुंतवणुक करण्याचा विचार करत असतो. सध्या गुंतवणूक बाजारात बऱ्याच योजना प्रचलित आहेत, ज्यात लोक गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू शकतात. बहुतेक लोक म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात. म्युचुअल फंडमधील गुंतवणूक कमी जोखीमीत जास्तीत जास्त परतावा देण्यास मदत करते. निवृत्तीनंतर तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही म्युचुअल फंड मध्ये आता पासूनच गुंतवणूक करायला हवी.

SWP म्हणजे काय ?
SWP म्हणजे “सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन”. ही एक गुंतवणूक पद्धत आहे ज्या अंतर्गत गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड योजनेतून एक ठराविक रक्कम हवी तेव्हा परत मिळते. यामध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती स्वतः ठरवू शकते, की त्याला आपल्या गुंतवणुकीतून किती काळानंतर किती पैसे काढायचे आहेत. SWP अंतर्गत, तुम्ही तुमचे पैसे काही दिवसात, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर काढू शकता.

पेन्शन लाभ :
जर तुम्ही कोणतीही जोखीम न घेता म्युचुअल फंड मध्ये गुंतवणुकीसाठी तयार असाल, तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पेक्षा SWP म्हणजे सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन तुमच्या साठी फायदेशीर आहे. SWP ही आपल्या गुंतवणुकीतून पद्धतशीर पैसे काढण्याची योजना आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात ठराविक रक्कम काढू शकता. जर तुम्ही 20 वर्षे नियमित दरमहा 5 हजार रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर चक्रवाढ पद्धतीने एवढं परतावा मिळेल, की तुम्ही दरमहा 35 हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळवू शकता.

दर महिन्याला पेन्शन मिळेल लाभ :
जर तुम्ही पुढील 20 वर्षे नियमित मासिक 5000 रुपये एसआयपी गुंतवणूक केली, तर यामध्ये तुम्हाला अंदाजे 12 टक्के व्याज परतावा मिळेल. तसेच, वीस वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 लाख रुपये झाले असेल. आता जर तुम्हाला यापेक्षा जास्त नफा हवा असेल तर तुम्ही हे म्युच्युअल फंड मधील 50 लाख रुपये SWP पद्धतीने इतर योजनांमध्ये ठेवू शकता. त्यावर तुम्हाला 8.5 टक्के व्याज परतावा देखील मिळेल. या आधारावर तुम्हाला मासिक 35 हजार रुपये पेन्शन सुरू होईल.

तुम्ही 20 वर्षांसाठी सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन सुरू केल्यास तुम्हाला 50 लाख रुपये चा घसघशीत परतावा मिळेल. SWP अंतर्गत तुम्ही 50 लाख रुपये वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवू शकता. या प्रकरणात, अश्या बऱ्याच योजना आहेत ज्यातून तुम्ही SWP अंतर्गत अंदाजे 8.5 टक्के परतावा मिळवू शकता. म्हणजेच यातून मिळणारा वार्षिक परतावा जवळपास 4.25 लाख रुपये वार्षिक असेल. अश्या पद्धतीने वार्षिक 4.25 लाख रुपये परतावा तुम्ही दर महिन्याला पेन्शन स्वरूपात काढू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual fund SIP- systematic withdrawal plan scheme Benefits on mutual funds SIP investment on 20 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या