Mutual Fund SIP | टॉप-अप एसआयपीद्वारे गुंतवणूक योगदान वाढवा आणि चमत्कार बघा, फायद्याची माहिती आहे का?
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात पद्धतशीर गुंतवणूक करण्याची SIP ही अशी पद्धत आहे, जी दीर्घ काळात गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून देण्याची क्षमता राखते. SIP पद्धत म्युचुअल फंडात मासिक आधारावर पैसे गुंतवणूक करण्याची सोपी पद्धत आहे. एसआयपी मध्ये गुंतवणुकदार दरमहा एक ठराविक रक्कम म्युचुअल फंड मध्ये जमा करत असतो. दर मासिक एसआयपी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकीवरील प्रत्यक्ष जोखीम विभागली जाते.
जर तुमच्या बँक खात्यात जास्तीचे पैसे शिल्लक असल्यास ते म्युचुअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करावे. बँक बचत खात्यात तुम्हाला एसआयपी एवढा परतावा कधीही मिळणार नाही. बऱ्याच वेळा हुशार गुंतवणुकदार आपला आपत्कालीन निधी बँक खात्यात सेव्ह करून न ठेवता तो सरळ एसआयपी मध्ये गुंतवतात, जेणेकरून आणीबाणीच्या काळात या पैशाचा वापर करता येईल. म्युच्युअल फंडांतर्गत गुंतवणुकदारांना टॉप-अप एसआयपी सुविधा देखील पुरवली जाते. या टॉप अप एसआयपीमुळे गुंतवणूकदारांना एसआयपीची रक्कम वार्षिक आधारावर वाढवता येते. ज्यांना आपली गुंतवणूक दर वार्षिक ठराविक टक्के वाढवायची आहे त्यांच्यासाठी टॉप अप सुविधा देण्यात आली आहे. या एसआयपी टॉप अप सुविधेचा “एसआयपी बूस्टर” असेही म्हणतात.
सामान्य SIP vs टॉप-अप SIP :
सामान्य म्युचुअल फंड SIP अंतर्गत पैसे जमा करताना गुंतवणूकदार त्यांच्या SIP कालावधीत त्यांचे योगदान वाढवू शकत नाहीत. उच्च परतावा मिळविण्यासाठी त्यांना नवीन योजनेची निवड करावी लागते. तर टॉप-अप एसआयपी किंवा एसआयपी बूस्टरमध्ये गुंतवणूकदारांना आपले एसआयपी योगदान स्वयंचलित पद्धतीने वाढवण्याची सुविधा दिली जाते. आपले उत्पन्न दर वार्षिक प्रमाणे वाढत असते, या आधारावर एसआयपी टॉप अप आपल्याला एसआयपी योगदान वाढवण्याची परवानगी देते.
टॉप-अप SIP ची सुरुवात :
म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करताना टॉप अप सुविधा चालू केली की, या पर्यायाच्या मदतीने गुंतवणूकदार आपल्या SIP मध्ये मासिक योगदान वाढवू शकतो. उदाहरणावरून समजून घेऊ, समजा जर तुम्ही म्युच्युअल फंड SIP अंतर्गत दरमहा 10 हजार रुपये जमा करत असाल आणि तुम्हाला पुढे जाऊन यापेक्षा अधिक पैसे गुंतवणूक करायचे असतील, तर तुमच्याकडे SIP टॉप अपचा पर्याय आहे. SIP टॉप अप च्या मदतीने तुम्ही तुमची गुंतवणूक रक्कम सहामाही किंवा वार्षिक आधारे वाढवू शकता.
Top Up SIP चे फायदे :
टॉप अप SIP नुसार जर तुमच्या गुंतवणूक योगदानात नियमित वाढ होत राहिली तर तुमचे आर्थिक लक्ष्य वेळेपूर्वी पूर्ण होऊ शकते. तुमचे आर्थिक लक्ष पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक काळ गुंतवणूक करावी लागणार नाही. एसआयपी योजना चालू असताना आपले एसआयपी योगदान वाढवून तुझी आपले आर्थिक लक्ष्य वेळेपूर्वी सहज साध्य करू शकता.
जागतिक अस्थिरता आणि वाढती महागाई यामुळे पैशाचे मूल्य सतत घटत चालेल आहे. या अस्थिर परिस्थितीतून जास्त नफा कमवायचा असेल तर सर्वात स्मार्ट मार्ग म्हणजे महागाई दराच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक एसआयपी गुंतवणुकीचे योगदान वाढवणे. त्यामुळे तुम्हाला महागाईशी लढण्यास मदत होईल आणि तुमची गुंतवणूकही वाढेल. टॉप-अप एसआयपी सुविधा ऑटो पायलट मोडमध्ये कार्य करते, याचा अर्थ गुंतवणूकदारांना प्रत्येक वेळी नवीन एसआयपी खाती उघडण्याची गरज नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Mutual Fund SIP Top Up scheme to increase investment in SIP in Autopilot mode on 6 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय