17 April 2025 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा

Mutual fund,

Mutual Funds | इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास ते दीर्घकाळात छान परतावा देतात. स्मॉल आणि मिड-कॅप म्युचुअल फंडांच्या तुलनेत, लार्ज-कॅप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे असते. कारण हे म्युचुअल फंड फर्म स्थिर व्यवसाय असलेल्या लार्ज-कॅप किंवा ब्लू-चिप कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करतात. म्युचुअल फंड आपल्या ग्राहकांना नेहमी सूचना देतात की, गुंतवणुक करण्याआधी नेहमी मागील काळाचे चार्ट पॅटर्न तपासावे. चांगला म्युचुअल फंड निवडण्याचा हाच एक योग्य मार्ग असू शकतो. आज या लेखात आम्‍ही तुम्‍हाला टॉप 10 लार्ज कॅप म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्यांनी गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा मिळवून दिला आहे.

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड :
या म्युचुअल फंड च्या चार्ट पॅटर्ननुसार हा फंड मागील 5 वर्षात सर्वात जास्त परतावा देणारा लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड ठरला आहे. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 15.03 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या फंडाने SIP च्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांत 13.48 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांकाला फॉलो करतो. S&P BSE 100 निर्देशांकाने ही गेल्या पाच वर्षांमध्ये 13 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे.

अॅक्सिस ब्लूचिप फंड :
अॅक्सिस ब्लूचिप म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 14.16 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या SIP नियमित योजनेच्या माध्यमातून 5 वर्षांत लोकांना 12.75 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. हा म्युचुअल फंड S&P BSE 100 निर्देशांक फॉलो करतो.

एडलवाईस लार्ज कॅप फंड :
डलवाईस लार्ज कॅप फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅनमध्ये गुंतवणूक करून लोकांनी 5 वर्षांत 13.25 टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. या योजनेत SIP च्या माध्यमातून लोकांनी 5 वर्षांत सरासरी वार्षिक 11.76 टक्के परतावा मिळवला आहे.

कोटक ब्लूचिप फंड :
कोटक ब्लूचिप फंडाच्या डायरेक्ट म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूकदारांनी गेल्या 5 वर्षांत 13.24 टक्के वार्षिक परतावा मिळवला आहे. SIP च्या माध्यमातून या म्युचुअल फंड योजनेने लोकांना 5 वर्षांत 11.91 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

UTI Mastershare Fund :
UTI Mastershare Fund डायरेक्ट प्लॅनने मागील 5 वर्षात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 13.23 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. SIP च्या माध्यमातून या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करून लोकांनी 5 वर्षात 12.23 टक्के नफा कमावला आहे.

सुंदरम लार्ज कॅप फंड :
सुंदरम लार्ज कॅप म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने मागील 5 वर्षांत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 12.97 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. SIP च्या माध्यमातून या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करून लोकांनी 5 वर्षांत 11.54 टक्के वार्षिक परतावा मिळवला आहे.

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड :
निप्पॉन इंडिया लार्ज कॅप म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 12.91 टक्के वार्षिक नफा कमवून दिला आहे. SIP च्या माध्यमातून या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करून लोकांनी 5 वर्षांत 11.90 टक्के वार्षिक परतावा मिळवला आहे.

मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड :
मिरे अॅसेट लार्ज कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 12.87 टक्के वार्षिक नफा कमावून दिला आहे. SIP च्या माध्यमातून या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करून लोकांनी 5 वर्षांत 11.73 टक्के वार्षिक परतावा कमावला आहे.

बडोदा बीएनपी परिबस लार्ज कॅप फंड :
बडोदा BNP परिबस या लार्ज कॅप म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ योजनेत गुंतवणूक करून लोकांनी 5 वर्षांत 12.80 टक्के वार्षिक नफा मिळवला आहे. SIP च्या माध्यमातून या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करून लोकांनी गेल्या 5 वर्षांत 11.42 टक्के वार्षिक नफा मिळवला आहे.

ICICI प्रुडेंशियल ब्लूचिप फंड :
ICICI प्रुडेन्शियल ब्लूचिप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक लोकांनी गेल्या 5 वर्षांत 12.60 टक्के नफा कमावला आहे. SIP च्या माध्यमातून या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुक करून लोकांनी 5 वर्षांत 11.79 टक्के वार्षिक सरासरी परतावा मिळवला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund Top 10 Large cap mutual fund list for investment and huge returns 07 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या