20 April 2025 6:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Mutual Funds Calculator | तुम्ही नियमित SIP गुंतवणूक करून 10 वर्षात 1 कोटी परतावा मिळवू शकता, गणित समजून घ्या

mutual funds SIP

Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये नियमित मासिक गुंतवणूक करून, कमी काळात 1 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. याद्वारे तुम्ही हळूहळू कोट्यावधी रुपयांचा परतावा सहज मिळवू शकता. जर तुम्ही 10, 15 किंवा 20 वर्षांसाठी SIP गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला चक्रवाढ व्याज रूपाने प्रचंड परतावा मिळेल.

मोठ्या रकमेची गरज लागत नाही :
SIP चा आणखी एक फायदा असा की गुंतवणूकदाराला गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज लागत नाही, खूप कमी पैश्यापासून तुम्ही SIP गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या बचतीची मासिक गुंतवणूक SIP म्युचुअल फंड मध्ये करू शकता. यामध्ये, म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीने, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या किती परतावा हवा आहे, हे जाणून मासिक किती एसआयपी गुंतवणूक करावी लागेल हे तुम्हाला जाणून घेता येईल.

10 वर्षात 1 कोटी परतावा :
म्युच्युअल फंड SIP तुम्हाला दर महिन्याला एक छोटीशी गुंतवणूक करण्याची संधी देते ज्यात तुम्ही ठराविक वेळेनंतर 1 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर मध्ये गणना केली तर असेल दिसेल की जर दर महिन्याला आपण सुमारे 44,000 रुपये SIP द्वारे गुंतवणुक सुरू केली आणि ते 10 वर्षे नियमित चालू ठेवली तर त्याचा परतावा म्हणून तुम्हाला 1,02,22,919 रुपये सहज मिळू शकतात. यात अंदाजे वार्षिक परतावा 12 टक्के असेल. जर तुम्ही 10 वर्षांसाठी SIP मध्ये मासिक 44,000 रुपये नियमित गुंतवले, तर तुमची गुंतवणूक मूल्य सुमारे 49.42 लाख रुपये असेल. तर या संपूर्ण कालावधीत गुंतवणूक परतावा सुमारे 52.80 लाख रुपये असेल. असे अनेक म्युचुअल फंड आणि योजना आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना २५ टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

त्याचप्रमाणे, 20 टक्के वार्षिक परतावा उदिष्ट असल्यास, तुम्हाला 28,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू करावी लागेल. 10 वर्षांनंतर तुमच्याकडे 1,07,06,180 रुपयांचा निधी तयार झालेला असेल. यामध्ये तुमचे एकूण गुंतवणूक मूल्य 33.60 लाख रुपये असेल आणि त्यावरील परतावा अंदाजे 73.46 लाख रुपये पेक्षा जास्त असेल.

25% पेक्षा जास्त परतावा :
म्युच्युअल फंडात तुम्हाला अनेक योजना भेटतील. ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षांत 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. उदाहरणार्थ, ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षांत 29 टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता. त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंडाने 27 टक्के परतावा दिला आहे. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाने 26 टक्के परतावा दिला. त्याचप्रमाणे क्वांटम स्मॉल कॅप फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

दीर्घकालीन SIP गुंतवणुकीचे लक्ष्य :
म्युचुअल फंड तज्ञ म्हणतात की, जर तुम्ही दीर्घकालीन SIP गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवत असाल तर त्यावर तुम्हाला 12-15 टक्के परतावा हमखास मिळू शकतो. एसआयपी हा गुंतवणुकीचा पद्धतशीर प्रकार आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावा देखील पारंपारिक उत्पन्नपेक्षा जास्त असतो. मात्र, यामध्येही धोका असणारच. त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम क्षमता विचारात घेऊन गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

जर आपण लवकरात लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला भरघोस परतावा मिळेल, म्हणून म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करावी. कारण, यामुळे तुम्हाला दीर्घ मुदतीत चक्रवाढ परताव्याचा लाभ मिळतो. तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षीही 44,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली, तर वयाच्या 45 व्या वर्षी तुमच्याकडे 1 कोटी रुपये असतील. ही रक्कम तुमच्या इतर निधी, बँक बॅलन्स यापासून कितीतरी पट मोठी असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds Calculator for SIP return on long term investment on 26 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(268)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या