Mutual Funds | आयसीआयसीआय म्युचुअल फंडाच्या 7 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना 14 पट परतावा देत आहेत
Mutual Funds | जागतिक घडामोडी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निर्गमन या मुळे गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कालावधीत भारतीय शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्सने केवळ 1.41 टक्के परतावा दिला आहे हे काही चांगले निर्देश नाही आणि पुढील काळ कठीण आहे असे चिन्ह निर्माण झाले आहे.
अनियंत्रित महागाईचा उच्च दर :
परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्याचा ओघ सुरू केला आहे, रशिया आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेला जागतिक तणाव आणि अनियंत्रित महागाईचा उच्च दर आणि त्यातील सतत होत जाणारी वाढ यामुळे संपूर्ण जगाच्या शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या सर्व नकारात्मक घडामोडीचा भारतीय तसेच जगातील इतर सर्व शेअर बाजारावर प्रचंड अस्थिरतेचे ढग निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या कालावधीत भारतीय शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्सने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ 1.41 टक्के परतावा दिला. दरम्यानच्या काळात म्युचुअल फंड मध्ये वाढ झालेली दिसून येत आहे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड अंतर्गत 7 योजना राबवल्या जातात, त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांचा परतावा दिला आहे. म्हणजेच, बेंचमार्कच्या तुलनेत गुंतवणूकदारांना 14 पट अधिक परतावा मिळाला आहे.
आकडेवारीच्या दृष्टीने परतावा किती?
म्युचुअल फंड च्या आकडेवारीनुसार, ICICI प्रुडेन्शियल योजनांमध्ये मागील एका वर्षात 14 ते 20 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये भारत कन्झम्पशन फंड, इक्विटी आणि डेट, मल्टी अॅसेट, रिटायरमेंट प्युअर इक्विटी फंड आणि एफएमसीजी फंड यांचा समावेश आहे. म्युच्युअल फंड तज्ञांचे असे मत आहे की या फंड हाऊसची योजना ही गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा देण्याची आहे. संबंधित फंड हाऊसने गेल्या एक वर्षापासून मूल्य धोरण अवलंबले आहे. त्यांच्या अनेक योजनांनी या कालावधीत 7 ते 13 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.यामध्ये लार्ज अँड मिड कॅप, इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड, डिव्हिडंड यील्ड इक्विटी फंड, व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड आणि एमएनसी फंड यांनी क्षमतेपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
फंड हाऊसच्या व्यवस्थापन मंडळाचे मत :
फंड हाऊसचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस नरेन म्हणतात की आमचा निर्णय काहीही असला तरी तो गुंतवणूकदार आणि फंडस् च्या दृष्टीने चांगला निर्णय असल्याचे सिद्ध झाले आहे. इंधन आणि उर्जा क्षेत्रात आपल्या गुंतवणुकीचे प्रमाण जास्त आहे. धातूमधील आमची गुंतवणूक कमी करून आम्ही FMCG सेक्टर मध्ये गुंतवणूक केली आणि त्याचा परतावा चांगला येत आहे. आम्ही अजूनही गुंतवणूकदारांना SIP आणि STP मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहोत असे अधिकारी म्हणाले. विविध मालमत्ता वर्ग असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची आम्ही सातत्याने शिफारस करत असून त्यातून चांगला परतावा येईल असा आमचा विश्वास आहे.
फंड आणि परतावा :
श्रेणीनुसार योजना आणि त्यांनी दिलेला 1 वर्षाचा परतावा (%) खालीलप्रमाणे :
* ICICI प्रूडेंशियल FMCG फंड – 20.07%
* ICICI प्रुडेन्शियल रिटायरमेंट प्युअर इक्विटी फंड – 19.10%
* ICICI प्रुडेंशियल भारत कन्झम्पशन फंड – 16.36% ICICI प्रुडेंशियल भारत कन्झम्पशन फंड – 16.36%
ICICI प्रुडेंशियल मल्टी असेट फंड चा परतावा :
* ICICI Prudential Multi Asset Fund 14.87%
* ICICI Prudential Equity & Debt Fund 14.21%
* ICICI Prudential India Opportunities Fund 12.42%
* ICICI Prudential Large & Mid Cap Fund 11.50%
* ICICI Prudential Dividend Yield Equity Fund 10.75%
* ICICI Prudential Value Discovery Fund 10.52%
* ICICI Prudential MNC Fund 7.00%
Source: Value Research, Data as on July 12, 2022
संबंधित आकडेवारी 12 जुलै 2022 पर्यंतची उपलब्ध आकडेवारी आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News title : Mutual Funds ICICI prudential mutual fund schemes return on 20 July 2022
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL