19 November 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईस 55% घसरली, आता तेजीचे संकेत, ICICI ब्रोकरेज बुलिश - NSE: IDEA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO
x

Mutual Funds | म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून तुमचे पैसे अनेक पटींनी कसे वाढतात? परतावा कसा मिळतो जाणून घ्या

Mutual funds

Mutual Funds | म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक असा जबरदस्त पर्याय आहे, ज्यात गुंतवणूक करून दीर्घकाळात मजबूत परतावा कमावता येतो. म्युचुअल फंडमध्ये दोन मार्गांनी गुंतवणूक करू शकता. एक म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन/SIP द्वारे आणि दुसरा म्हणजे एकरकमी गुंतवणूक करून. जर तुम्हाला म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल SIP पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्ही जबरदस्त नफा कमवू शकता. म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे फार सोपे आहे, तुम्ही स्वतः फंड संशोधन करून म्युचुअल फंड निवडू शकता, किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही 10 वर्षांसाठी म्युचुअल फंडमध्ये 50 हजार रुपये एकरकमी गुंतवणूक केली तर किती परतावा मिळू शकतो आपण हे एका हिशोबाने समजून घेऊ.

परताव्याची गणना :
तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 50000 रुपये गुंतवणूक केल्यास 10 वर्षांनंतर तुम्हाला किती परतावा मिळेल याचा एक हिशोब समजून घेऊ. ग्रो ॲपच्या गणनेनुसार, जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एकरकमी 50 हजार रुपये 10 वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 12 टक्के परतावा मिळू शकतो. समजा तुमचा वार्षिक सरासरी परतावा 12 टक्के असेल तर 10 व्या वर्षी तुम्हाला 163101 रुपये परतावा मिळेल. यामध्ये तुमच्या 50000 रुपये गुंतवणुकीवर 113101 व्याज परतावा मिळेल.

जर तुम्ही म्युचुअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करत असाल तर कराल Grow ॲपनुसार, जेर तुम्ही दर महिन्याला 25,000 रुपये SIP गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 10 व्या वर्षी 12 टक्के सरासरी वार्षिक रिटर्ननुसार एकूण 58,08477 रुपये परतावा मिळेल. 10 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 30 लाख रुपये असेल आणि त्यावर तुम्हाला 28,08477 लाख रुपये परतावा मिळेल. म्युच्युअल फंडात कोणत्याही माध्यमांतून गुंतवणूक केल्यास तुम्ही चांगला परतावा कमवू शकता.

लम्पसम म्युचुअल फंड कॅल्क्युलेटर :
जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एकरकमी गुंतवणूक करता तेव्हा लम्पसम कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही ठराविक कालावधीसाठी किती परतावा मिळू शकतो याची गणना तुम्ही करू शकता. हे म्युचुअल फंड कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल याची गणना करुन देतात. लम्पसम म्युचुअल फंड कॅल्क्युलेटरच्या मदतीने निश्चित परतावा, एकूण परतावा, वार्षिक परतावा, पॉइंट टू पॉइंट रिटर्न यासारख्या बर्‍याच आकडेवारीची गणना करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual funds investment opportunities through SIP and Lumpsum Amount for high returns on 19 October 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x