22 February 2025 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज
x

Mutual Funds | 5 स्टार रेटिंग असलेले हे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा पैसा वेगाने वाढवत आहेत, श्रीमंत करणाऱ्या फंडाची नावं सेव्ह करा

Mutual Funds

Mutual Funds| इक्विटी मार्केटमधील उलाढालीचा विचार करून आणि जोखीमचा विचार करून, गुंतवणूकदार सामान्यत: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात. कारण म्युचुअल फंड जबरदस्त परतावा मिळविण्यासाठी सर्वात भारी पर्याय आहे. वेगवेगळे म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारचे सेवा आणि गुंतवणुकीची संधी देतात. आणि वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवणूक करतात. हे गुंतवणूकदारावर अवलंबून असते की त्यांना कोणत्या म्युचुअल फंड मध्ये पैसे गुंतवायचे आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला 4 सर्वोत्कृष्ट 5 स्टार रेटेड म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहोत.

अॅक्सिस ब्लूचिप फंड डायरेक्ट प्लॅन :
हा म्युचुअल फंड भारतातील टॉप रेटेड फंडांपैकी एक आहे. दीर्घ कालावधीसाठी या म्युचुअल फंड एसआयपीमध्ये परतावा जबरदस्त मिळतो. या वर्षीचा वार्षिक SIP परतावा नकारात्मक -3.15 टक्के होता. या म्युचुअल फंडाच्या SIP गुंतवणुकीमध्ये मागील 3 वर्षांचा वार्षिक परतावा 17.10 टक्के होता. तर मागील 5 वर्षांचा परतावा सुमारे 14.53 टक्के होता. 8 सप्टेंबर 2022 पर्यंत, या म्युचुअल फंडाची निव्वळ मालमत्ता मूल्य 50.04 रुपये होते. या म्युचुअल फंडाच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये 88.04 टक्के इक्विटी, 11.85 टक्के कर्ज आणि 0.11 टक्के रोख आणि रोख इक्विटी यांचा समावेश आहे.

म्युचुअल फंडाची बहुतांश गुंतवणूक 37.42 टक्के सह आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात आहे. सर्वाधिक गुंतवणूक याच क्षेत्रांत आहे. तर टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक 11.95 टक्के आहे. Axis Bluechip Fund कडे अनेक उच्च दर्जाचे ग्रोथ स्टॉक आहेत. या म्युचुअल फंडच्या गुंतवणूक पोर्टफोलिओ मध्ये ICICI बँक, Avenue Supermarts, Bajaj Finance, HDFC बँक, Infosys, Tata Consultancy Services आणि Kotak Mahindra Bank यांसारख्या दिग्गज स्टॉकचा समावेश आहे.

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड डायरेक्ट प्लॅन :
इक्विटी-आधारित सिक्युरिटीजमध्ये दीर्घकालीन नफा कमवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा ग्रोथ फंड प्लॅन जबरदस्त आहे. या म्युचुअल फंडाचा परतावा मध्यम मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी खूप नफा कमावून देणारा आहे. या म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात 1.46 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षांत या फंडाने तब्बल 26.56 टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. आणि 5 वर्षांत तर या फंडाने 18.70 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा कमावून दिला आहे. 8 सप्टेंबर 2022 पर्यंत, या फंडाची NAV म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 52.26 रुपये होते. फंडाचा पोर्टफोलिओ सुमारे 90.6 टक्के इक्विटी मध्ये गुंतवलेला आहे. फंडाच्या शीर्ष समभागांमध्ये एचडीएफसी, बजाज होल्डिंग्ज, मायक्रोसॉफ्ट, अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड, एचसीएल टेक्नॉलॉजीज, कोल इंडिया यां सारख्या दिग्गज स्टॉकचा समावेश आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड :
हा ग्रोथ फंड लार्ज-कॅप स्टॉकच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी योग्य आहे. या फंडाचा परतावा मध्यम आकाराचा असून दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी या फंड मध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे. या फंडाने मागील एका वर्षात तब्बल 6.78 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षांत, या फंडाने तब्बल 18.85.टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि मागील 5 वर्षांत, या फंडाने 12.42 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, लार्सन अँड टर्बो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीज, अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या दिग्गज स्टॉकचा समावेश आहे.

क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड :
हा म्युचुअल फंड पायाभूत सुविधा उद्योग करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी योग्य आहे. या म्युचुअल फंडाचा परतावा आकार अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी मध्यम मुदतीचा आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूकदारांसाठी खूप जबरदस्त परतावा आहे. मागील एका वर्षात, या म्युचुअल फंडाने तब्बल 27.40 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा कमावला आहे. मागील 3 वर्षांत तर या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 44.14 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि या फंडाने मागील 5 वर्षांमध्ये 23.85 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा कमावला दिला आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये लार्सन अँड टर्बो, अदानी एंटरप्रायझेस, अंबुजा सिमेंट, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया या दिग्गज स्टॉकसह इतरही लार्ज-कॅप आणि मिड-कॅप स्टॉकचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Funds investments for long term returns on 11 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x