16 April 2025 9:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Mutual Funds | तुम्हाला मोठा परतावा हवा असेल तर म्युचुअल फंड गुंतवणुकीवरील जोखीम कशी कमी कराल, जाणून घ्या

mutual fund

Mutual Funds | 2022 वर्षाच्या सुरवातीपासूनच जागतिक बाजार आणि आंतरराष्ट्रिय व्यापारात अस्थिरतेचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. त्यात आणखी भर पडली रशिया-युक्रेन युद्धामुळे, आणि जगभरातील शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली. ह्याचा परिणाम असा झाला की गुंतवणूकदारांसाठी थेट इक्विटीमध्ये पैसे गुंतवणे धोक्याचे झाले होते, मग त्यांनी आपली गुंतवणूक म्युच्युअल फंडकडे वळवली. मात्र म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असतेच, परंतु ती जोखीम कमी करून नुकसान टाळता येते.

जोखमीचे असते पण जोखीम कमी करू शकता :
शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणने आहे की इक्विटी मार्केटप्रमाणेच म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करणे जोखमीचे असते पण जोखीम कमी करून देखील नुकसान टाळू शकतो. देशांतर्गत तसेच जागतिक, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वैश्विक व्यापारातील अस्थिरता ही कारणे आहेत, ज्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर विपरित परिणाम झाला आहे. म्युच्यअल फंड व्यवस्थापक आणि तज्ञ यांच्या मदतीने तुम्ही म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक धोरण बदलून हा निर्माण झालेला धोका कमी करू शकता आणि नुकसान टाळू शकता. बाजारात अनेक म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम गुंतवणूक संधी निवडू शकता आणि आपले पैसे गुंतवणूक करू शकता.

दिर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीचा विचार करा :
म्युचुअल फंड तज्ञ म्हणतात की, जास्त परतावा हा उद्देश ठेवून तुम्ही म्युच्युअल फंड योजना निवडत असाल, तर नेहमी दिर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीचा विचार करावा. मागील 8 ते 10 वर्षांचा दीर्घकालीन रेकॉर्ड पाहून आपण खरेदी आणि विक्री या दोन्ही परिस्थितींमध्ये म्युचुअल फंडाची कामगिरी समजून घेऊ शकता. मागील 10 वर्षांच्या आकडेवारीच्या निरीक्षण करून फंडाची एकूण कामगिरीचे आकलन करू शकता आणि योग्य फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. कमीत कमी 2-3 वर्षांच्या कालावधीत सातत्याने चांगली कामगिरी करणारा फंड निवडलेले जास्त सुरक्षित आहे.

आर्थिक जोखमीचे मूल्यांकन करून गुंतवणूक करा:
SEBI च्या नियमानुसार, अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने तिच्या सर्व फंडांसाठी रिस्क-ओ-मीटर दाखवणे आवश्यक आहे. यामध्ये म्युच्युअल फंडाशी संबंधित सर्व जोखीम पातळींबद्दल माहिती देणे बंधनकारक आहे. पूर्वी म्युचुअल फंड रिस्क-ओ-मीटर मध्ये फक्त काही विशिष्ट श्रेणीशी संबंधित जोखीम दर्शवली जात होती, परंतु आता कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी, या मीटरमध्ये आपण कोणत्या फंडात किती जोखीम आहे आणि आपल्या क्षमतेस अनुकूल आहे की नाही, ह्याचे मूल्यांकन तुम्ही करू शकता. त्याची जोखीम पातळी, पत, व्याजदर, बाजार भांडवल आणि अस्थिरता यांसारख्या जोखमींच्या आधारावर तुम्ही त्यांचे मूल्यांकन करू शकता.

NFO मध्ये गुंतवणूक करणे टाळा:
बाजारातून भांडवल उभारणी करण्यासाठी ॲसेट मॅनेमेंट कंपनी नव नवीन म्युचुअल फंड ऑफर जाहीर करत असतात. मात्र गुंतवणूकदार जास्त परताव्यासाठी एनएफओमध्ये गुंतवणूक करतात आणि नुकसानीला सामोरे जावे लागते. नवीन गुंतवणूकदारांनी सर्व एनएफओमध्ये गुंतवणूक करणे टाळलेले चांगले, कारण या बाजारात आलेल्या नवीन ऑफर आहेत आणि त्यांच्याबद्दल जास्त माहिती सार्वजनिक केली जात नाही. त्यामुळे काळजीपूर्वक गुंतवणूक करावी.

लार्ज कॅप्स, मिडकॅप्स :
गुंतवणूकदारांना स्मॉलकॅप्स म्हणजेच लघु भांडवल गुंतवणुकीत सर्वात जास्त परतावा देण्याची क्षमता असते, परंतु त्यात जोखीम देखील जास्त आहे. लार्जकॅप्समध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे कारण ते बाजारातील मंदीच्या काळातही चांगला परतावा देतात. लार्जकॅप्स म्युचुअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातात, ज्यांची त्यांच्या क्षेत्रात मजबूत पकड आहे. बाजारातील मंदीच्या काळात थोडेफार पडले जरी काही काळानंतर त्यांचे शेअर्स वर जातात आणि जास्त नुकसान होत नाही.

मूलभूत गोष्टी:
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील मूलभूत गोष्टी तपासा आणि खात्री करून घ्या. फंडाचा पोर्टफोलिओ किती मजबूत आहे हे त्यांचे पोर्टफोलिओ पाहून तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याचे पैसे विविध क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमध्ये गुंतवले जातात की नाही हेही तुम्ही तपासू शकता . मुलभूतरित्या कमकुवत असलेल्या फंडात गुंतवणूक केल्याने कमी वेळात कमी परतावा मिळू शकतो,पण ते दीर्घकाळ ठेवल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mutual funds long term return benefits on 21 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund NFO(7)#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या