18 November 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Mutual Funds | म्युच्युअल फंडात दररोज फक्त 500 रुपये गुंतवणूक करून 1.5 कोटी रुपये परतावा मिळवा, चक्रवाढ पद्धतीने मिळतो परतावा

Mutual fund SIP

Mutual Funds | म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा असा एक जबरदस्त पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित लहान गुंतवणूक करून इक्विटी मार्केट मधील गुंतवणुकीप्रमाणे परतावा मिळवू शकता. जर तुम्ही छोटी रक्कम बचत करून दर महिन्याला म्युचुअल फंडमध्ये गुंतवणुकीची सवय लावली, तर तुम्ही दीर्घ मुदतीत लाखो करोडो रुपयेची कमाई करू शकता.

एसआयपी कॅल्क्युलेटर:
म्युच्युअल फंड एसआयपी हा एक गुंतवणुकीचा जबरदस्त पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित लहान गुंतवणूक करून इक्विटी मार्केट मधील गुंतवणूक प्रमाणे भरघोस परतावा मिळवू शकता. उदाहरणार्थ, समजा तुम्ही दररोज 500 रुपये बचत करून दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणुक करण्याचा पर्याय निवडला, तर तुम्ही पुढील 20 वर्षांत तब्बल 1.5 कोटींचा परतावा सहज मिळवू शकता. बर्‍याच इक्विटी म्युच्युअल फंडांचा दीर्घ कालावधीत वार्षिक सरासरी परतावा 12 टक्केच्या जवळपास असतो. दीर्घ कालावधीसाठी एसआयपी गुंतवणूक करण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा मजबूत परतावा मिळतो.

फक्त 500 रुपये गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
SIP कॅल्क्युलेटर नुसार, समजा आपण दररोज 500 रुपये जमा करत असाल, तर तुमची दर महिन्याला 15,000 रुपये बचत होईल. जर तुम्ही दरमहा 15,000 ची SIP गुंतवणूक करत असाल आणि त्यावर तुम्हाला परतावा म्हणून सरासरी वार्षिक 12 टक्के रक्कम मिळू शकते. त्यामुळे तुम्ही पुढील 20 वर्षांत नियमित गुंतवणूक करून 1.5 कोटी रुपये सहज कमवू शकता. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 36 लाख रुपये होईल आणि त्यावर तुम्हाला अंदाजे 1.1 कोटी रुपये (1,13,87,219 रुपये) परतावा मिळेल. यामध्ये वार्षिक सरासरी परतावा कमी झाला किंवा वाढला तर तुमचा मिळणारा एकूण परतावा देखील कमी किंवा जास्त होऊ शकतो.

वार्षिक 6 टक्के दराने महागाई दर समायोजित केल्यास SIP कॅल्क्युलेटरनुसार, जर आपण 20 वर्षे नियमित दरमहा 15,000 ची गुंतवणूक करत राहिल्यास, तुम्हाला 12 टक्के दराने तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळू शकतो. पण, इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तुम्हाला दरवर्षी महागाईलाही सामोरे जावे लागेल. म्हणजेच तुमचा परतावा किती आहे आणि महागाई दर किती आहे, तुम्ही वार्षिक सरासरी परताव्यासह चलनवाढीचा दर समायोजित केल्यास तुम्हाला प्रत्यक्षात किती नफा मिळू शकेल याचा अंदाज येईल.

20 वर्षांच्या गुंतवणुकीच्या कालावधीत वार्षिक सरासरी महागाई दर 6 टक्के आहे असे गृहीत धरल्यास, SIP कॅल्क्युलेटरनुसार, आपण 15,000 रुपये नियमित मासिक गुंतवणूक 20 वर्षे करत राहिल्यास, सरासरी वार्षिक परतावा 12 टक्के आणि सरासरी महागाई दर 6 टक्के असेल,या नुसार तुम्हाला मिळणारा अंदाजे परतावा 69.7 लाख रुपये असेल. यामध्ये तुमची गुंतवणूक फक्त 36 लाख रुपये असेल,आणि त्यावर मिळणारा अंदाजे परतावा 33.7 लाख रुपये असेल.

SIP गुंतवणुकीचा पद्धतशीर मार्ग :
गुंतवणूक बाजारातील म्युचुअल फंड तज्ञ म्हणतात की SIP हा गुंतवणुकीचा पद्धतशीर पर्याय आहे. असे अनेक म्युचुअल फंड आहेत. अश्या म्युचुअल फंड मध्ये मिळणारा दीर्घकालीन सरासरी वार्षिक SIP परतावा 12 टक्केच्या जवळपास असतो. येथे लक्षात घेतले पाहिजे की मागील वर्षी मिळालेले परतावे हे फक्त एक सांकेतिक आकडे असतात, भविष्यातही तुम्हाला दरवर्षी तेवढाच परतावा मिळेल, याची कोणतीही शाश्वती नाही.

गुंतवणूकदाराने आपले उत्पन्न, आर्थिक लक्ष्य आणि जोखीम क्षमता विचारात घेऊन म्युचुअल फंडमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. म्युच्युअल फंड SIP ची खासियत म्हणजे तुम्ही फक्त 100 रुपये जमा करून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. SIP कॅल्क्युलेटर द्वारे तुम्ही बचत क्षमता, जोखीम आणि त्यावरील परताव्याचे आकलन सहजपणे जाणून आणि समजून घेऊ शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual funds SIP investment benefits for long term on 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(243)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x