23 February 2025 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

PPF Vs Mutual Funds | पीपीएफ आणि म्युच्युअल फंड पैकी तुमच्यासाठी गुंतवणुकीचा फायद्याचा पर्याय कोणता जाणून घ्या

PPF, Mutual funds

PPF Vs Mutual Funds | आपण सर्वच आजकाल आपल्या कमाईचा काही भाग वाचवून गुंतवणूक करत असतो, जेणेकरून भविष्यात चांगला परतावा मिळवता येईल. उत्पन्न कमी असो वा जास्त आपण कितीही कमावत असलो तरी काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काही भाग वाचवून गुंतवणूक करतो. लोकांचे स्वतःचे गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग असतात.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न :
काही लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात, काही लोक बँक खात्यात पैसे ठेवतात आणि व्याज घेतात, काही लोकं मालमत्ता खरेदी करतात, काही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. अशा परिस्थितीत पीपीएफ आणि म्युच्युअल फंडाच्याबाबतीत तर लोक नेहमी गोंधळात असतात की या दोघांपैकी कोणती गुंतवणूक करावी? करावी की करू नये? चांगली आहे की नाही? चला तर मग आज तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

गुंतवणुकीतील जोखीम:
तज्ञांच्या मते, कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या आणि सुरक्षित परतावा हवा असेलल्या गुंतवणूकदारांसाठी पीपीएफ हा एक योग्य गुंतवणूक पर्याय आहे. तर दुसरीकडे ज्याची जास्त जोखीम घ्यायची क्षमता आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहेत.

दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय:
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा पीपीएफपेक्षा चांगला पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे सल्ला देतात. दीर्घकालीन म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर किमान 12 टक्के परतावा मिळेल अशी शक्यता असते आणि कमाल परतावा हा कितीतरी पट जास्त असू शकतो. पण पीपीएफचा व्याजदर सरकारकडून ठरवलेला असतो.

कर सवलतीच्या दृष्टिकोनातून:
पीपीएफ आणि म्युच्युअल फंडावरील करांबाबत फरक दिसेल की, दीर्घकालीन म्युच्युअल फंड गुंतवणूक मधील भांडवली नफावर कर लागू पडते, दुसरीकडे, पीपीएफमधील गुंतवणुकीवर आपल्याला कर सवलत मिळते.

PPF आणि म्युचुअल फंड यांचे वेगवेगळे फायदे आहेत: 

म्युच्युअल फंड:
1) दीर्घकालीन परतावा जास्त आहे
2) तुम्ही थोड्या पैशाने सुरुवात करू शकता
3) तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ञ लोकांकडून केले जाते.

पीपीएफ:
1) सरकारकडून गुंतवणुकीवर सुरक्षिततेची हमी दिली जाते
2) कर सवलत आणि सूट मिळते
3) किमान 500 रुपये पासून गुंतवणूक करता येते
4) व्याज आणि स्थिर उत्पन्न हमी .

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PPF Vs Mutual Funds benefits and Risk with benefits on 21 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund Investment(199)#PPF(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x