19 April 2025 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Quant Mutual Fund | मल्टिबॅगर शेअर नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 93% परतावा मिळतोय, फंडाची डिटेल्स

Quant Mutual Fund Scheme

Quant Mutual Fund | म्युच्युअल फंडमध्ये गुतंवणूक करणाऱ्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे अनेक योजनांमधून सर्वाधिक फायदा मिळवून देणारी योजना निवडणे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका म्युच्यूअल फंड योजनेबदृल माहीती देणार आहेत, जीने मागील काही वर्षात आपल्या गुतंवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. ज्या लोकांनी या योजनेत गुंतवणुक केली होती, त्याच्या गुतंवणूकीचे मुल्य अल्पावधीत म्हणजेच अवघ्या तीन वर्षात दुप्पट झाले आहे. (Quant Mutual Fund, Quant Small Cap Fund – Direct Plan | Quant Small Cap Fund latest NAV today | Quant Small Cap Fund latest NAV and ratings)

क्वांट स्मॉल कॅप फंड :
या म्युच्युअल फंड योजने मध्ये एसआयपीद्वारे गुतंवणुक केल्यास अल्पावधीत तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. जर तुम्ही जानेवारी २०२० मध्ये क्वांट म्युच्युअल फंड योजनेत एसआयपी पध्दतीने गुतंवणुक सुरू केली असती, तर दरमहा नियमित १०,००० रुपये गुतंवणुक करुन अपल्पावधीत तुमच्या गुतंवणुकीचे मुल्य ६.९६ लाख रुपये झाले असते. यात तुमची प्रत्यक्ष गुतंवणूक ३.६ लाख रुपये असती आणि तीन वर्षानंतर तुम्हाला त्यावर ६.९६ रुपये परतावा मिळाला असता. म्हणजेच अल्पावधीत तुमच्या गुंतवणूकीचे मुल्य ९३.४ टक्के वाढले असते. मात्र म्युच्युअल फंडात पैसे लावताना नेहमी ध्यानात ठेवा की स्मॉल कॅप फांडात पैसे लावणे धोक्याचे असते. यातील गुतंवणूकीचे मुल्य कधी कमी होईल याचा नेम नाही. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाच्या युनिटच्या किमती लार्ज कॅपपेक्षा अधिक वेगाने वर खाली होत असतात. म्हणुनच स्मॉल कॅप म्युच्यूअल फंड योजनांना इतर योजनांच्या तुलनेत फार अस्थिर मानले जाते. येतात.

क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेचा आढावा :
या म्युच्युअल फंड मधील मोठा हिस्सा हा स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुतंवला जातो. असेल. यात प्रामंख्याने आरबीएल बँक, पंजाब नॅशनल बँक, बिकाजी फूड्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या कंपनीचा समावेश होतो. या यादीत सर्वात वर आयटीसी कंपनी आहे. याशिवाय असे काही शेअर्स आहेत ज्यांनी मागील काळात बरीच उलाढाल नोंदवली ओह. पंजाब नॅशनल बँक स्टॉक देखीत यात सामील आहे. या म्युच्युअल फंड योजनेचा मुख्य उद्देश स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावून आपल्या गुतंवणूकदारांना भरघोस फायदा मिळवुन देणे आहे. ज्या लोंकानी या योजनेत नियमित गुंतवणुक केली त्यांना दिर्घकाळात अप्रतिम परवाता मिळाला आहे. क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाचा फंड आकार २८७० कोटी रुपये आहे. हा आकार स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांसाठी फार चांगला मानला जातो.

गुंतवणूक करावी का?
साधारणपणे म्युच्युअल फंड तज्ञ स्मॉल कॅप म्युच्युअल फंडामध्ये पैसे लावण्याचा सल्ला देत नाही, कारण यात पैसे लावणे फार धोकयाचे मानले जाते. जर तुम्ही या योजनेत आपली पुर्ण आयुष्याची कमाई गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा विचार शहाणपणाचा नाही. कारण स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना जोखमीची मानली जाते. त्यात अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणाम उलाढाल होऊ शकते, जे तुमच्या गुंतवणुकीचे मुल्य कमी करु शकते. दुसरे म्हणजे, या योजनेला कोरोनानंतरच्या रॅलीचा जो जबरदस्त फायदा झाला होता, तो पुढील काही वर्षां मिळत राहील याची शक्यता कमी आहे.

गुंतवणुक करताना या गोष्टी ध्यानात ठेवा
म्युच्युअल फंड तज्ञ भुतकाळातील परताव्याचा अंदाज घेऊन एखादी योजना भविष्यात किती परवाता देऊ शकते याचे भाकीत करू शकतात, मात्र ते भाकीत खरे होईलच याची खात्री नाही. अशा काही म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी भुतकाळात दिलेल्या परताव्याची पुनरावृत्ती केलेली नाही. म्हणून म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणु करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे SIP मानला जातो. यात तुम्ही दरमहा काही पैसे जमा करू शकता आणि दिर्घकाळात जबरदस्त परतावा कमवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quant Mutual Fund Small Cap Fund Latest NAV on 23 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quant Mutual Fund Scheme(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या