19 April 2025 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

SBI Mutual Fund | एसबीआयच्या 'या' जबरदस्त फंडामुळे गुंतवणूकदार मालामाल, पैसा चौपटीने वाढवा, फायदा घ्या - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | आजकाल प्रत्येकजण भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. दरम्यान म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असून, अनेक व्यक्तींनी खंडात पैसे गुंतवून जास्तीत जास्त लाभ मिळवला आहे.

एसबीआयचा असाच एक म्युच्युअल फंड आहे. ज्याचं नाव हेल्थ केअर अपॉर्च्युनिटीज फंड असं आहे. या फंडाने अवघ्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना चौपटीने लाभ मिळवून दिला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने एसबीआयच्या या फंडात 5 वर्षांपहिले 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, हीच रक्कम अवघ्या 5 वर्षांत 4 लाख रुपये झाली असती. या फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एसआयपी माध्यम निवडू शकता. एसआयपीच्या माध्यमातून प्रतिमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही तब्बल 12 लाख रुपयांचा फंड तयार करू शकता.

उदाहरणाचं कॅल्क्युलेशन समजून घ्या :

1. SBI हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज फंड
2. एकरक्कमी केलेली गुंतवणूक 1 लाख रुपये
3. गुंतवणुकीची मर्यादा एकूण पाच वर्ष
4. 5 वर्षानंतर मिळणारा सरासरी परतावा 32.90%
5. एकूण जमा रक्कम 4,14,596.
6. मासिक एसआयपी 10,000
7. एकूण गुंतवणूक सहा लाख रुपये
8. 5 वर्षांचा वार्षिक परतावा 30.9%
9. जमा फंड रक्कम 12,80,774

गुंतवणुकीची योग्य वेळ :

हा फंड त्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त आहे ज्यांना स्वास्थ्य किंवा आरोग्य क्षेत्रात पैशांची गुंतवणूक करून ठेवायची आहे. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून पैसे जमा करून गुंतवणुकीची जोखीम कमी करू शकता.

गुंतवणुकीविषयी माहिती घ्या :

एसबीआयचा हा फंड आरोग्य आणि स्वास्थ्य क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कमालीची गुंतवणूक करतो. या फंडाचा 96.24% भाग इक्विटीमध्ये आणि 3.76% पैशांमध्ये म्हणजेच एस्सेस मध्ये आहे. त्याचबरोबर Divi’s Lab आणि Cipla सारख्या कंपन्या देखील शामील आहेत.

एसबीआयच्या या फंडाचे महत्वाचे डिटेल्स :

1. बेंचमार्क BSE Healthcare Total Return Index
2. ऍसेट अंडर मॅनेजमेंट : 3,357.28 करोड
3. जोखीम : उच्चदर्जाची
4. एसबीआयचा आरोग्याची निगडित असलेला हा फंड चांगला परतावा देतो.
5. फंड दीर्घकाळासाठी असल्यामुळे अनेकांना याचा लाभ देखील होतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 11 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या