15 January 2025 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडच्या या 3 योजना करोडमध्ये परतावा देतं आहेत, मजबूत परतावा देणाऱ्या योजनांची लिस्ट सेव्ह करा

SBI Mutual fund

SBI Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि पैसे वाढवू इच्छित असाल तर तुम्ही SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, SBI फोकस्ड इक्विटी आणि SBI मॅग्नम इक्विटी ESG फंड या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. मागील 5 वर्षांत या तिन्ही SBI म्युच्युअल फंडांनी एकरकमी गुंतवणुकीवर आणि SIP गुंतवणूकीवर भरघोस परतावा कमावून दिला आहे.

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड :
व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, या योजनेत तुम्ही 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असती, तर तुमचे 1 लाख रुपये वाढून आता 3.26 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही या SBI म्युच्युअल फंडात 5 वर्षांपूर्वी 10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक केली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 14.51 लाख रुपये झाले असते.

SBI फोकस्ड इक्विटी म्युचुअल फंड :
SBI च्या या म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना एकरकमी आणि मासिक SIP दोन्हीमध्ये बंपर परतावा कमावून दिला आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी SBI फोकस्ड इक्विटी प्लॅनमध्ये एक लाख रुपये जमा केले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.19 लाख रुपये झाले असते. या म्युचुअल फंडात 10000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य चक्रवाढ व्याज पद्धतीने वाढून 10.23 लाख रुपये झाले असते.

SBI मॅग्नम इक्विटी ESG फंड :
SBI ने ऑफर केलेली ही म्युच्युअल फंड योजना मागील 5 वर्षांतील सर्वाधिक परतावा कमावून देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक योजना आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या SBI म्युचुअल फंड योजनेत 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 1.93 लाख रुपये परतावा मिळाला असता. जी तुम्ही SBI मॅग्नम इक्विटी ईएसजी फंडमध्ये 5 वर्षांपूर्वी 10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक केली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 9.68 लाख रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Mutual fund investment opportunities and return in long term on 16 May 2023.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(157)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x