19 November 2024 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

SBI Mutual Fund | खरं की काय? SBI बँक FD नव्हे तर SBI म्युच्युअल फंडाच्या या टॉप 5 योजना खिसा भरतील, नोट करा

Highlights:

  • SBI PSU फंड :
  • एसबीआय निफ्टी बँक ईटीएफ
  • एसबीआय निफ्टी प्रायव्हेट बँक ईटीएफ
  • SBI Consumption Mutual Fund
  • SBI Banking and Financial Services Fund :
SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या गुंतवणूकदारांसाठी अनेक गुंतवणूक योजना राबवते. 2022 या वर्षात SBI बँक स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 30 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. इतर लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत एसबीआय बँकच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.

SBI म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. या वर्षी SBI स्टॉकप्रमाणे SBI म्युच्युअल फंडाने ही चांगले रिटर्न्स दिले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 SBI म्युचुअल फंड योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी 2022 मध्‍ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. (Get latest net asset value (NAV) for all SBI Mutual Fund schemes. Track your mutual fund NAV online with ease)

SBI PSU फंड :
SBI PSU म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमवून दिला आहे. 30 नोव्‍हेंबर 2022 पर्यंत एसबीआय पीएसयू म्युचुअल फंडाच्‍या व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच AUM 535 कोटी रुपये होते. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.45 टक्के आहे. या म्युचुअल फंडात तुम्ही किमान 5,000 रुपये जमा करून प्रारंभिक गुंतवणूक सुरू करु शकता. तर SIP मध्ये 500 रुपये लावून तुखी गुंतवणूक सुरू करु शकता.

एसबीआय निफ्टी बँक ईटीएफ :
एसबीआय निफ्टी बँक ईटीएफने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल योजनेचा AUM 4793 कोटी रुपये आहे. त्याच वेळी या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.20 टक्के आहे. तुम्ही या योजनेत किमान 5,000 एकरकमी रक्कम लावून गुंतवणूक सुरू करु शकता.

एसबीआय निफ्टी प्रायव्हेट बँक ईटीएफ :
एसबीआय निफ्टी प्रायव्हेट बँक ईटीएफ म्युचुअल फंडने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाचे AUM 137 कोटी रुपये आहे. 31 मार्च 2022 रोजी या म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 0.15 टक्के होते. या योजनेत तुम्ही किमान 5,000 रुपये जमा करून गुंतवणूक करू शकता.

SBI Consumption Mutual Fund :
या म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेचा AUM 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 1194 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.24 टक्के आहे. यात एकरकमी गुंतवणुक करण्यासाठी तुम्हाला किमान 5,000 रुपये जमा करावे लागेल. तर एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागेल.

SBI Banking and Financial Services Fund :
या म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंडाचे AUM प्रमाण 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 3984 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. तर या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 0.80 टक्के आहे. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 5,000 रुपये आहे. तर एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 500 रुपये आहे.

SBI म्युच्युअल फंड हाऊस अनेक नवीन योजना बाजारात लाँच करते. नुकताच SBI म्युच्युअल फंडाने ‘SBI लाँग ड्युरेशन फंड’ लाँच केला आहे. ही नवीन फंड ऑफर 12 डिसेंबर 2022 रोजी पासून ते 20 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी ओपन करण्यात आली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Fund Scheme For huge returns check details on 25 May 2023.

FAQ's

How to Start SBI Mutual Fund SIP Online?

एसबीआय म्युच्युअल फंडात कोणत्याही त्रासाशिवाय ग्रोच्या माध्यमातून ऑनलाइन गुंतवणूक सुरू करता येते. पर्यायाने ते संबंधित फंड हाऊसच्या वेबसाइटवरूनही गुंतवणूक करू शकतात. एसबीआय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी इतर कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करू शकता.

How to Calculate SBI Mutual Fund SIP?

एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपीची गणना करण्यासाठी, काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे जसे की..

* गुंतवणुकीची रक्कम
* एसआयपीचा कार्यकाळ
* आपल्या एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपीची संख्या (असल्यास) आधीच भरली आहे
* अपेक्षित व्याजदर

How to redeem SBI Mutual Fund?

ऑफलाइन पद्धतीने एसबीआय म्युच्युअल फंड रिडीम करण्यासाठी जवळच्या फंड हाऊसमध्ये जाऊन फॉर्म सबमिट करू शकता. पर्यायाने, गुंतवणूकदार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतो आणि फोलिओ नंबरसह साइन इन करून गुंतवणूक रिडीम करू शकतो. ते एसबीआय म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कोणत्याही ऑनलाइन पोर्टलवरून काढून घेऊ शकतात जिथे त्यांनी गुंतवणूक केली आहे.

How to stop a SIP in an SBI Mutual Fund online?

होय, आपण केवळ एसआयपी रिक्वेस्ट रद्द करून कधीही आपली एसआयपी ऑनलाइन थांबवू शकता. आपली एसआयपी थांबविण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी, आपण फोलिओ नंबरसह एसबीआय म्युच्युअल फंडवेबसाइटवर लॉग इन करू शकता किंवा आपल्या एजंटशी संपर्क साधू शकता किंवा आपण गुंतवणूक केलेल्या ऑनलाइन गुंतवणूक प्लॅटफॉर्मवरील चरण तपासू शकता.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x