15 January 2025 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

SBI Mutual Fund | या आहेत पैसाच पैसा देणाऱ्या SBI म्युच्युअल फंडाच्या 5 सर्वोत्तम योजना, पैसा 9 पटीने वाढतोय, नोट करा लिस्ट

SBI Mutual fund

SBI Mutual Fund | म्युचुअल फंड बाजारात अनेक फंड हाऊसेस आहेत, जे आपल्या ग्राहकांना म्युच्युअल फंड योजना ऑफर करतात. त्यापैकी एक प्रसिद्ध म्युचुअल फंड हाऊस SBI म्युच्युअल फंड असून हा भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा म्युच्युअल फंड आहे. लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप किंवा सेक्टरल फंड असो, प्रत्येक श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी SBI म्युचुअल फंड हाऊसने गुंतवणूक पर्याय निर्माण केला आहे.

SBI म्युचुअल फंड ही देशातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड योजनापैकी एक असून त्यांच्या काही म्युचुअल फंड योजना 20 वर्षे किंवा त्याहून जास्त जुन्या आहेत. SBI म्युच्युअल फंडाचे मागील 10 वर्षांचे परतावा चार्ट पाहिले तर तुम्हाला समजेल की एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यां लोकांना या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करून 9 पट अधिक नफा झाला आहे. या म्युचुअल फंड योजनेत एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना ही जबरदस्त परतावा मिळाला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला मागील 10 वर्षांच्या कामगिरीवर आधारित सर्वोत्तम 5 म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊ या योजना सविस्तर

एसबीआय स्मॉल कॅप फंड :
एसबीआय म्युच्युअल फंडाची मागील 10 वर्षांत मोठ्या प्रमाणात भरघोस परतावा कमावून देणारी योजना म्हणजे एसबीआय स्मॉल कॅप फंड स्कीम आहे. या योजनेने मागील 10 वर्षात आपल्याला गुंतवणुकदारांना 25 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. या योजनेत ज्या लोकांनी 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांना 10 वर्षात 9 लाख रुपये मिळाले आहेत. त्याच वेळी, ज्यां लोकांनी 5000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली होती, त्यांना आता 22.5 लाखांचा परतावा मिळाला आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 5000 रुपये आहे, आणि एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 500 रुपये आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 11288 कोटी रुपये होती, तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.73 टक्के होते.

एसबीआय टेक अपॉर्च्युनिटीज फंड :
SBI Tech Opportunities Fund ने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. या योजनेत ज्यां लोकांनी 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांना 10 वर्षात 6.35 लाख रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, ज्यां लोकांनी या म्युचुअल फंड मध्ये दर महिन्याला 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना योजनेतून आता 20 लाखांचा परतावा मिळाला आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान 5000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. किंवा एसआयपी मध्ये किमान 500 रुपयांमध्ये दरमहा जमा करावे लागतील. 31 जानेवारी 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 2313 कोटी रुपये झाली होती, तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत या म्यूचअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.23 टक्के गणले गेले होते.

एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड :
SBI मॅग्नम मिडकॅप म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देणारी मशीन ठरली आहे. या म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. या योजनेत ज्या लोकांनी 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांना मागील 10 वर्षात 6.16 लाख रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, ज्यां लोकांनी या योजनेत 5000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांना 16.5 लाखांचा परतावा मिळाला आहे. या योजनेत, किमान 5000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते आणि किमान SIP गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे. 32 जानेवारी 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6859 कोटी रुपये नोंदवली गेली होती, तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.94 टक्के गणले गेले होते.

एसबीआय टेक फोकस्ड इक्विटी फंड :
SBI Tech Opportunities mutual Fund ने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदरांना 18 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. या योजनेत ज्या लोकांनी 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांना 10 वर्षात 5.28 लाख रुपये परतावा झाला आहे. त्याच वेळी, ज्यां लोकांनी या काळात 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांना आता 15.5 लाखांचा परतावा मिळाला आहे. या म्युचुअल फंड योजनेत किमान एकरकमी गुंतवणूक 5000 रुपये आहे. तर एसआयपी किमान गुंतवणूक मर्यादा 500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 23186 कोटी रुपये नोंदवली गेली होती, तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 1.92 टक्के गणले गेले होते.

SBI Consumption Opportunities Fund :
SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेने मागील 10 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना प्रचंड परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 17.87 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या योजनेत 1 लाखाची एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांना 10 वर्षात 5.18 लाख रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, ज्यां लोकांनी या काळात 5000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली होती त्यांना दीर्घकाळात 14 लाखांचा नफा झाला आहे. या म्युचुअल फंड योजनेत किमान एकरकमी गुंतवणुक मर्यादा 5000 रुपये आहे. तर एसआयपी मध्ये किमान गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 892 कोटी रुपये नोंदवली गेली होती, तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 2.44 टक्के गणले गेले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Mutual fund Scheme for long term investment and good returns from SIP on 05 April 2023.

हॅशटॅग्स

#SBI Mutual Funds(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x