23 February 2025 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

SBI Mutual Fund | सरकारी बँकेची ही म्युचुअल फंड योजना SIP बचतीवर 8 पटीने परतावा देतं आहे, योजनेचा तपशील जाणून घ्या

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund| भारतात असंख्य लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत. आणि त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे मागील काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ नगा मिळवून दिला आहे.

‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ ही म्युचुअल फंड योजना देखील सर्वोत्तम परतावा देणाऱ्या फंडांमध्ये सामील आहे. या म्युचुअल फंड योजनेला व्हॅल्यू रिसर्च फर्मने 4 स्टार आणि मॉर्निंगस्टारने 5 स्टार रेटिंग प्रदान केले आहे. या म्युचुअल फंड योजनेची सुरुवात 9 सप्टेंबर 2009 रोजी झाली होती. 30 सप्टेंबर 2022 रोजी ‘SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट-ग्रोथ फंड’ ची AUM 14,494 कोटी रुपये होती. तर 25 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाचा NAV 128.14 रुपये होता.

‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपन्याच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. याशिवाय, ते लार्ज कॅप आणि मिड-कॅप कंपन्यांसह कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. मागील 12 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 20.46 टक्के परतावा कमावून दिला आहे.

SBI स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने एका वर्षात 13.87 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ ने बीएसई सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा दिला आहे. BSE सेन्सेक्सने मागील एका वर्षात 1.64 टक्के परतावा दिला आहे.

5 वर्षात दिला 18.15 टक्के परतावा :
‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ने मागील तीन वर्षात लोकांना वार्षिक सरासरी 29.71 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर S&P BSE-250 स्मॉल कॅप इंडेक्सने 26.34 टक्के परतावा दिला आहे. BSE सेन्सेक्सने मागील पाच वर्षात 15.39 टक्के परतावा दिला आहे.

मागील पाच वर्षांत ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ ने S&P BSE 250 Small Cap Index आणि BSE सेन्सेक्स इंडेक्सपेक्षा जास्त परतावा दिला आहे. BSE-250 स्मॉल कॅप निर्देशांकाने पाच वर्षात फक्त 10.12 टक्के परतावा दिला आहे. तर BSE सेन्सेक्स इंडेक्सने 14.22 टक्के परतावा मिळवून दिला आहे. एसबीआय स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील पाच वर्षांत सरासरी वार्षिक 18.15 टक्के परतावा दिला आहे.

गुंतवणुकीवर परिणाम :
जर तुम्ही 1 वर्षापूर्वी ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ या म्युचुअल फंडात 10,000 रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 11,387 रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात 10,000 रुपये लावले असते, तर आतापर्यंत तुमचे गुंतवणूक मूल्य 21838.95 रुपये झाले असते.

त्याचप्रमाणे जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात 10,000 रुपये लावले असते तर आता तुमची गुंतवणूक वाढून 23046.59 रुपये झाली असती. जर तुम्ही 12 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात 10,000 रुपये लावले असते तर तुम्हाला आता 11,3791 रुपये परतावा मिळाला असता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund Small Cap Fund scheme NAV on 10 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(178)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x