19 November 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

SIP Calculator | धमाकेदार परतावा देणाऱ्या योजनेत दररोज फक्त 50 रुपये बचत करा, केवळ 5 वर्षात व्हाल लखपती

SIP Calculator

SIP Calculator | म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवून करून तुम्ही नियमित लहान लहान बचतींमधूनही इक्विटी मार्केट सारखे भरघोस परतावे मिळवू शकता. SIP मध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे आणि सरळ आहे. जर तुम्ही नियमितपणे गुंतवणुकीची सवय लावली तर तुम्ही पुढील काही वर्षांत लाखो रुपयांचा परतावा कमावू शकता.

म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक:
म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे, तुम्ही नियमित छोटी रक्कम गुंतवणूक करून इक्विटी मार्केट सारखा परतावा मिळवू शकता. या योजनेत गुंतवणूक करणे अगदी सोपे आणि सरळ आहे. जर तुम्ही तुमच्या उत्पांनामधून एक छोटी रक्कम दर महिन्याला बचत करून गुंतवण्याची सवय लावली तर तुम्ही पुढील काही वर्षांत तुम्हाला लाखो रुपयांचा परतावा सहज मिळू शकतो. जर तुम्ही दररोज फक्त 50 रुपये बचत केली आणि दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणुक केली तर तुमची मासिक गुंतवणूक 1500 रुपये असेल. SIP चा पर्याय निवडला तर तुम्ही 5, 15, 25 वर्षांत लाखो रुपयांचा परतावा सहज कमवू शकता. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक गुंतवणूक योजना आहेत, ज्यांनी दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. SIP ची खास गोष्ट अशी आहे की तुम्ही यामध्ये किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

SIP दीर्घकालीन चक्रवाढीचे फायदे :
समजा एखादी व्यक्ती दररोज 50 रुपयांची बचत करते, तर त्याची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. तो व्यक्ती स्वतची जोखीम क्षमता पाहून दरमहा 1500 रुपयांची म्युचुअल फंड एसआयपी सुरू करू शकतो. दीर्घ कालावधीसाठी एसआयपी गुंतवणूक चालू ठेवल्याने त्यावर चक्रवाढ व्याजाचे प्रचंड फायदे मिळतात. किरकोळ गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी एसआयपी गुंतवणुकीला प्राधान्य देतात.

AMFI च्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये SIP गुंतवणुकीतील एकूण योगदान 12,327.91 कोटी रुपये झाला आहे आणि SIP गुंतवणुकीचा हा विक्रमी उच्चांक ठरला आहे. यावरून हे स्पष्ट होते की गुंतवणूकदारानी सध्याच्याही बाजार परिस्थितीत SIP मध्ये गुंतवणूक चालू ठेवली आहे आणि ती वाढत देखील आहे. आणि एक गुंतवणुकीचे योग्य साधन म्हणून एसआयपीवर लोकांचा विश्वास अजूनही मजबूत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार म्युचुअल फंड SIP मधील एकूण योगदान 11,237.70 कोटी रुपये होते.

एडलवाइज म्युच्युअल फंड कंपनी यांच्या मते, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी पद्धतशीर किंवा शिस्तबद्ध गुंतवणूक दीर्घकाळासाठी अधिक फायदेशीर आणि स्थिरता देणारी असते. म्हणूनच बाजारातील किरकोळ गुंतवणूकदार नियमित गुंतवणुकीसाठी SIP ला प्राधान्य देतात. गुंतवणूकदारांचा कल फक्त परतावा मिळवणे नसतो तर जोखीम समायोजित परताव्यावर असते. यासाठी SIP हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय मानला जातो.

5 वर्षांत अंदाजे परतावा :
समजा तुम्ही दररोज 50 रुपये बचत करत असाल तर तुमची दर महिन्याला 1500 रुपये बचत होईल. जर तुम्ही दरमहा 1500 रुपयेची SIP गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला 12 टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर तुम्ही 5 वर्षात 1.20 लाख रुपयेपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकता. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 90 हजार रुपये असेल आणि तुम्हाला मिळणारा परतावा 33 हजार रुपये असेल.

15 वर्षांत अंदाजे परतावा :
समजा तुम्ही दररोज 50 रुपये बचत करत असाल तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. जर तुम्ही दरमहा 1500 ची SIP गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला 12 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर, तुम्ही 15 वर्षात 7.50 लाख रुपयेपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकता. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 2.7 लाख रुपये असेल, आणि तुम्हाला 4.9 लाख रुपयांचा निव्वळ परतावा मिळेल.

25 वर्षांत अपेक्षित परतावा :
समजा तुम्ही दररोज 50 रुपये बचत करत असाल तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. जर तुम्ही दरमहा 1500 रुपये ची SIP गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर 12 टक्के वार्षिक परतावा मिळेल. या योजनेतून तुम्ही 15 वर्षात 28.5 लाख रुपयेपेक्षा जास्त परतावा मिळवू शकता. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 4.5 लाख रुपये असेल आणि तुम्हाला मिळणारा परतावा 24 लाख रुपये असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SIP Calculator for mutual fund returns on long term investing on 18 August 2022.

हॅशटॅग्स

#SIP Calculator(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x