20 February 2025 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक 42 टक्क्यांनी घसरू शकतो, तज्ज्ञांचा अलर्ट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Trident Idea Share Price | ट्रायडंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TRIDENT IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा स्टॉक 52-वीक लो जवळ आला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर तेजीत, टॉप ब्रोकरेज बुलिश, मजबूत कमाईची होणार - NSE: TATAPOWER RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरमध्ये तुफान तेजी, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RVNL EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, महिना 15,000 रुपये पगार असणाऱ्यांना इतकी पेन्शन मिळेल HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन वाढत नाहीत, अशा फंडात वाढतात, 1 लाख रुपयांवर मिळेल 1.74 कोटी रुपये परतावा
x

Mutual Fund SIP | गुंतवणुकीआधी SIP म्युच्युअल फंडांचे रहस्य जाणून घ्या, सुरू करा गुंतवणूक, मिळेल बंपर परतावा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याआधी प्रत्येक व्यक्तीने फंडांचे पूर्ण वैशिष्ट्ये जाणून घेतले पाहिजे. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या फ्लेक्सिबिलिटीविषयी देखील माहिती करून घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वित्तीय गरजेनुसार गुंतवणूक कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

काही कारणांमुळे व्यक्ती थेट म्युच्युअल फंडच स्विच करतात. परंतु असं केल्याने दीर्घकाळात तुम्हाला मोठा परतावा मिळवण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमची गुंतवणूक ही पूर्णतः फंडाचे प्रदर्शन आणि बाजार मूल्यावर आधारित असते.

म्युच्युअल फंड स्विचिंग म्हणजे नेमकं काय :
केवळ एकाच फंड हाऊस अंतर्गत गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या म्युच्युअल फंड स्विच करता येते. यालाच म्युच्युअल फंड स्विचिंग असे म्हणतात. अगदी सहजरीत्या वेगवेगळ्या म्युच्युअल फंड हाऊसमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. काही गुंतवणूकदार रेगुलर प्लॅनमधून थेट डायरेक्ट प्लॅनमध्ये स्विच करतात. असं केल्यानंतर एजंटला वेगळे असे कमिशन द्यावे लागत नाही. त्यामुळे आपले पैसे वाचतात आणि फंडाची वृद्धी होण्यास मदत होते.

म्युच्युअल फंड स्विचिंग करण्याचे कारण काय :
बहुतांश गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओचे संतुलन राखण्यासाठी म्युच्युअल फंड स्विच करण्याचा निर्णय घेतात. समजा इक्विटी फंड जास्त प्रमाणात वाढला असेल तर, डेट म्युच्युअल फंडात स्विच करण्याचा प्रयत्न करतात. सुरक्षा मिळवण्यासाठी बहुतांश गुंतवणूकदार डेट म्युच्युअल फंडातच स्विच करण्याचा निर्णय घेतात. एवढेच नाही तर एखाद्या फंडाचे मॅनेजर बदललेले असतील आणि आपल्याला त्यांच्या गुंतवणुकीची रणनीती पटली नसेल तरी देखील तुम्ही म्युच्युअल फंड स्विच करण्याचा निर्णय घेऊ शकता.

फंड स्विच केल्याने होते नुकसान :
म्युच्युअल फंड स्विच करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे ती म्हणजे तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड स्विच करत असताना तुमचे थोड्याफार प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. ही एक मुक्त प्रक्रिया नसून यामध्ये एक टक्क्याचे 1% एक्झिट लोड द्यावे लागते. त्याचबरोबर फंडाचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधी आपण फंड सोडून दुसऱ्या फंडात स्विच करत असाल तर, तुम्हाला टॅक्सेशन द्यावे लागते. त्याचबरोबर एखादा गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडात कमीत कमी म्हणजेच केवळ एका वर्षामध्ये गुंतवणूक करत असेल आणि फंड स्विच करण्याचा निर्णय घेत असेल तर 15% शॉर्ट टर्म गेन कॅपिटल टॅक्स द्यावा लागतो.

अशावेळी म्युच्युअल फंड स्विच करू नका :
काही व्यक्ती बाजारातील चढ-उताराला घाबरून फंड स्विच करण्याचा निर्णय घेतात. परंतु तुम्ही जर फंडामध्ये गुंतवणूक करत आहात तो फंड दीर्घकाळात तुम्हाला सांगली कमाई करून देणारा असेल तर, फंड स्विच करण्याचा निर्णय घेणे अयोग्य आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x