7 January 2025 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडमध्ये झपाट्याने गुंतवणुकीची वाढ होताना पाहायला मिळत आहे. बऱ्याच व्यक्तींना SIP तसेच म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे अधिक फायद्याचे वाटत आहे. कारण की यामध्ये, मार्केट बेसनुसार पैसे वाढतात. मागील काही दिवसांमध्ये म्युच्युअल फंडात केवळ गुंतवणूकच नाही तर, परतावा देखील प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

SIP आणि म्युच्युअल फंडाविषयीची माहिती सांगणारे अनेक सल्लागार सोशल मीडियावर सर्रासपणे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सध्या तरुण पिढीचा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी कल वाढलेला आहे. दरम्यान बरेच सेलिब्रेटी देखील SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देत आहेत. परंतु तुम्ही नवीनच या क्षेत्रात उतरत असाल तर, काही गोष्टींची खास काळजी घेणेदेखील महत्वाचे आहे.

एकाच योजनेत गुंतवणूक करू नका :

एकाच योजनेत गुंतवणूक करू नका. कारण की प्रत्येक फंडाचे परताव्याचे स्वरूप वेगवेगळे असते. समजा तुम्ही एकाच फंडमध्ये गुंतवणूक केली तर, तुम्ही जास्त जोखीमेच्या अधीन जाऊ शकता. परंतु दोन वेगवेगळ्या फंडमध्ये गुंतवणूक केल्याने तू मला ही गोष्ट नक्कीच स्पष्ट होईल की, कोणता फंड तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळवून देऊ शकतो. या गोष्टीमुळे तुम्हाला योग्य फंड निवडताना कोणत्याही प्रकारची अडचण पुढे निर्माण होणार नाही.

वेगवेगळे फंड हाऊसेस निवडा :

गुंतवणूकदाराने वेगवेगळ्या फंड हाऊसेसमध्ये आपल्या भडगंज पैशांची गुंतवणूक करावी. कारण की, एकाच फंड हाऊसमध्ये पैसे गुंतवले तर, ते धोक्याचे मानले जाते. यामध्ये तुमचे भले मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे फंड निवडताना वेगवेगळ्या विविध फंड हाऊसेस निवडा. असं केल्याने तुमची जोखीमही कमी होईल आणि दीर्घकाळात तुम्हाला बऱ्यापैकी परतावा मिळेल.

गुंतवणुकीसाठी फंडाचे योग्य प्रकार कोणते :

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही फंडविषयी संपूर्ण माहिती लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर सर्वाधिक परताव्यासाठी आणि कमी जोखीमेसाठी तुम्ही लार्ज कॅप फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही मल्टी आणि मिडकॅप फंडमध्ये देखील पैशांची गुंतवणूक करू शकता परंतु, या फंडमध्ये सहसा जास्तीची जोखीम पाहायला मिळते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x