31 December 2024 4:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

SIP Mutual Fund | पगारदारांनो, म्युच्युअल फंडचा श्रीमंत करणारा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कमी गुंतवणुकीतून मिळेल 6.32 कोटी परतावा

SIP Mutual Fund

SIP Mutual Fund | एसआयपी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक असा प्रकार आहे ज्यामधून तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून दीर्घकाळात भरपूर मोठा फंड तयार करू शकता. त्याचबरोबर तुम्ही काही टॅक्स सेविंग फंडांमध्ये पैसे गुंतवणूक तुमचा टॅक्स देखील वाचू शकता.

तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गुंतवणूकदाराला एक अशा पद्धतीचा फॉर्म्युला किंवा एक अशी गुंतवणूक योजना हवी असते ज्यामधून तो पटापट श्रीमंत बनू शकतो. आज आम्ही तुम्हाला एसआयपी म्युच्युअल फंडचा एक असाच फॉर्म्युला सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही 6 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळवू शकता.

गुंतवणुकीचे सातत्य महत्वाचे :

तुम्ही एसआयपी गुंतवणुकीचा कोणताही फॉर्म्युला वापरा जर तुमच्या गुंतवणुकीत सातत्य नसेल तर, तुम्ही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकणार नाही. यासाठी सातत्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून एकूण किती पैसे मिळवायचे आहेत याचे निश्चित करता आले पाहिजे. त्यानुसार तुम्ही विविध फॉर्मुलांचा वापर करून एस आय पी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. तुमच्यासाठी हा एक फॉर्म्युला देखील जबरदस्त ठरू शकतो. या फॉर्म्युला विषयी जाणून घ्या.

20:20:20 या फॉर्म्युलाच्या मदतीने करा SIP :

20:20:20 या फॉर्म्युलाच्या मदतीने तुम्ही काही दिवसांत 6 कोटींपेक्षा जास्तीचा फंड तयार करू शकता. यामध्ये 20 म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे. दुसरे 20 म्हणजे तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीवर प्रत्येक वर्षाला 20% अनुमानीत परतावा मिळणार आणि शेवटचे 20 म्हणजे तुम्हाला तुमची गुंतवणूक 20 वर्षापर्यंत सातत्याने सुरू ठेवायची आहे. तरच तुम्हाला 6 कोटींपेक्षा अधिकचा फंड तयार करता येऊ शकतो.

असे तयार होतील 6 कोटी रुपये :

समजा तुम्ही 20 टक्के परतावा देणाऱ्या फंडात गुंतवणूक करत असाल तर 20 वर्षानंतर 20,000 SIP चे 6,32,29,587 कोटी रुपये जमा होतील. यामधून तुम्ही गुंतवलेली रक्कम केवळ 48,00,000 रुपये असेल आणि परताव्याची मिळालेली रक्कम 5,84,29,587 रुपये एवढी असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SIP Mutual Fund Sunday 29 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SIP Mutual Fund(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x