26 December 2024 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News

Smart Investment

Smart Investment | आत्तापर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना म्युच्युअल फंड आणि एसआयबाबतच्या गुंतवणुकीविषयी चांगली माहिती झालीच असेल. बरेच लोक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करून लाखो करोडोच्या संख्येने पैसे कमावत आहेत. परंतु गुंतवणुकी पूर्वी तुम्हाला गुंतवणुकी बाबतचे सर्व नियम आणि अटी त्याचबरोबर गुंतवणुकीची सर्व माहिती असायला हवी.

सध्या शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूकदारांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो. परंतु प्रत्येक व्यक्तीला शेअर मार्केटमधील सर्वच गोष्टी समजतात असं नाही आहे. त्यामुळे ज्यांना जोखीम पत्करायची नाही आणि शेअर मार्केटमध्ये उतरायचं नसेल त्यांनी थेट एसआयपी म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे सुरू केले पाहिजे. मार्केटच्या घसरणीमुळे किंवा वाढीमुळे गुंतवणूकदारांना घसघशीत फायदा अनुभवता येतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही अगदी अचूक पद्धतीने गुंतवणूक करण्यास समर्थ व्हाल.

गुंतवणुकीची सुरुवात लवकरात लवकर करा :

तुम्हाला लवकरात लवकर एसआयपीच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवायचे असतील तर, तुम्ही कमी वयापासूनच गुंतवणूक सुरू केली पाहिजे. कारण की लवकर गुंतवणूक सुरू केल्यामुळे तुम्हाला चक्रवाढीचा चांगला फायदा अनुभवता येतो. म्हणजेच तुम्ही दीर्घ काळासाठी पैसे गुंतवले तर, तुमचे पैसे देखील तितक्याच वेगाने वाढतील.

योग्य फंडाची निवड आहे गरजेची :

पैशाची गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही योग्य फंडाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. जो फंड तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकेल असा फंड तुम्ही निवडा. मार्केटमध्ये अशा पद्धतीचे अनेक फंड उपलब्ध आहेत.

गुंतवणुकीचे सातत्य असावे :

समजा तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल तर, तुमच्या गुंतवणुकीत सातत्य असणे अत्यंत गरजेचे आहे. सातत्यामुळे तुम्ही फार कमी काळातच मोठा फंड तयार करू शकता.

कालांतराने एसआयपीची रक्कम वाढवा :

तुम्ही कालांतरानुसार SIP गुंतवणुकीमध्ये वेळोवेळी वाढ केली पाहिजे. जस जसा तुमचा पगार वाढतो तसतशी तुम्हाला एसआयपी मधील गुंतवणुकीची रक्कम देखील वाढवायची आहे. जेणेकरून तुमच्या संपत्तीला एक प्रभावी मार्ग लाभतो.

मार्केट टायमिंग टाळा :

शेअर मार्केटमधील मार्केट टाइमिंगमुळे तुम्हाला धोका मिळण्याचे देखील चान्सेस आहेत. ज्यामुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू ठेवू शकता.

एसआयपी कॅल्क्युलेटर :

तुम्हाला तुमच्या परताव्याची संभाव्यता माहित असण्यासाठी तुम्ही एसआयपी कॅल्क्युलेटर वापरणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याला आपण एसआयपी रिटर्न कॅल्क्युलेटर असं देखील म्हणतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x