25 October 2024 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GG Engineering Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 90 पैसे, स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनी नफा 1422% वाढला - Penny Stocks Jio Finance Share Price | संधी सोडू नका, जिओ फायनान्शियल शेअर देणार मोठा परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Horoscope Today | व्यवसायात बरकतीचा योग तसेच, 'या' राशींच्या पुरूषांना होईल धनलाभ, वाचा तुमचे आजचे राशीभविष्य Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर Dimple Kapadia | अभिनेत्री डिंपल कपाडियाने स्वतःच्याच लेकीचा केला अपमान, म्हणाली, 'मी कोणत्याही ज्युनिअरसोबत पोज देत नाही' Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
x

Smart Investment | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करा गुंतवणुकीची सुरुवात, केवळ 3 हजाराच्या गुंतवणुकीमुळे बनाल करोडपती

Smart Investment

Smart Investment | ज्योतिष शास्त्रानुसार धनत्रयोदशीचा दिवस सर्वांसाठी अत्यंत फलदायी दिवस असतो. या दिवशी तुम्ही कोणतही शुभकार्य अगदी आरामात करू शकता. बरेच लोक धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोनं किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करतात.

दरम्यान दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येणारा दिवाळी सण प्रत्येकासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा असणार आहे. त्याचबरोबर नोकरदारांना दिवाळीमध्ये बोनस प्राप्ती होते. सगळं कसं मंगलमय वातावरण असतं. कशातच धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे दिवाळी सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही बचतीचा मार्ग नक्कीच शोधून काढू शकता. यासाठी तुम्ही शुभ मुहूर्तावर केवळ 3000 हजारांची गुंतवणूक करून करोडपती देखील बनू शकता.

एसआयपी आणि म्युच्युअल फंड :
सध्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात पहिल्या स्थानावर एसआयपी आणि म्युच्युअल फंड असलेले पाहायला मिळतात. लोकांना बऱ्याच प्रकारच्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे फायद्याचे वाटते. त्याचबरोबर दीर्घकाळापर्यंत जास्तीत जास्त फंड तयार करून ठेवण्यासाठी अनेकांना एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि अधिक फायद्याचे वाटते.

अशी करा बचत :
समजा एखाद्या व्यक्तीने धनत्रयोदशीच्या दिवसापासून 100 रुपयांची गुंतवणूक सुरू केली असेल तर, पुढील एका महिन्यात दररोज 100 रुपयांच्या हिशोबाने 3 हजारांची रक्कम जमा होईल. जर तुम्ही ही गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून सातत्याने सुरू ठेवली तर, दरमहा 3000 च्या हिशोबाने पुढील 20 आणि 25 वर्षांत कोट्यधीश बनू शकता.

एसआयपी किती परतावा देते :
सध्याच्या घडीला एसआयपीमध्ये 12% टक्क्यांनी परतावा दीला जातो. म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या रिटर्नच्या व्याजदराचे टक्के जास्त असल्यामुळे तुम्ही फार कमी वेळात कितीतरी कोटींचे मालक बनू शकता.

एकूण 20 वर्षांत एवढा फंड तयार होईल :
तुम्ही 20 वर्षांसाठी दरमहा 3,000 हजारांची एसआयपी सुरू केली तर, तुमच्या खात्यात 7,20,000 रुपयांची गुंतवणूक जमा होईल. या गुंतवणुकीवर तुम्हाला 12% व्याजदरानुसार व्याजदर लाभेल. ज्यामुळे ही रक्कम दुपटीने वाढवून 22,77,444 एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. म्हणजेच एकूण 20 वर्षानंतर तुमच्या हातात 29,97,444 एवढ्या रुपयांचा ऐवज येईल.

25 वर्षांचे कॅल्क्युलेशन देखील पाहून घ्या :
समजा एखाद्या व्यक्तीने एसआयपीमध्ये दरमहा 3 हजारांच्या हिशोबाने 25 वर्षांसाठी सातत्याने गुंतवणूक केली तर, 25 वर्षांत 9 लाख रुपयांची रक्कम जमा होते. ही रक्कम 12% व्याजदराने 47,92,905 एवढी होईल. म्हणजेच 25 वर्षांत एसआयपीच्या माध्यमातून केवळ 3000 हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही 56,92,905 रुपयांचा फंड जमा करू शकाल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x