20 April 2025 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Smart Investment | लखपती बनायचंय? मग दररोज वाचवा फक्त 10 रुपये; आजच अशी करा स्मार्ट बचत

Smart Investment

Smart Investment | प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण पैशांची बचत करावी. परंतु कमी पगार असल्यामुळे बचत किती करायची आणि खर्च किती करायचा? या गोष्टीचा ताळमेळच बसत नाहीत. ज्या व्यक्तींना पंधरा ते वीस हजारा दरम्यान दरमहापगार मिळत असेल तर तुम्ही फक्त दहा रुपयांची सेविंग करून लखपती बनू शकता. हे वाक्य तुम्हाला हस्त्यास्पद वाटू शकतं परंतु तितकच प्रॅक्टिकल देखील आहे. तुम्हाला दररोज दहा रुपये वाचवून महिन्याला तीनशे रुपयांची एसआयपी करून पैसे गुंतवायचे आहेत. नेमके कसे? जाणून घ्या.

लखपती बनण्याचं स्वप्न तर सगळेच पाहतात. परंतु तुम्हाला हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी म्युचल फंडमधील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मार्फत तुम्ही पैसे गुंतवू शकता. एसआयपीमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ घेता येतो. त्यामुळे लॉन्ग टर्ममध्ये जास्त पैसे मिळण्याची शक्यता असते.

SIP म्हणजे काय ?
गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजेच एसआयपी. SIP द्वारे तुम्ही प्रत्येक महिन्याला म्युचल फंडमध्ये फंड जमा करू शकता. एसआयपीमध्ये तुम्हाला बँकेपेक्षा सांगली व्याजदर मिळतात. कारण की, एसआयपी हे हुबेहूब बँक आरडीप्रमाणेच काम करते. बँक खात्यामधून ठराविक दिवशी ठरवून ठेवलेली रक्कम बाजूला काढून एसआयपीमध्ये गुंतवली जाते.

आतापासूनच सुरू करा 300 रुपयांची SIP :
तुम्हाला महिन्याच्या प्रत्येक दिवसाला दहा रुपये वाचवायचे आहे. त्यानंतर महिन्याच्या हिशोबाने 300 रुपये सेविंग करायचे आहेत. गुंतवणूक करण्यासाठी 300 रुपयांनी सुरू केल्यानंतर प्रत्येक वर्षी किमान 10% हि रक्कम वाढवायची आहे. जर तुम्ही असं केलं तर, पुढील 30 वर्षांमध्येच तुमच्या खात्यामध्ये 45 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड जमा होईल.

या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी 15% रिटर्न अमाऊंट मिळून 45 लाख एवढा फंड जमा होईल. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये केलेली गुंतवणूक ही पाच लाख 92 हजार पर्यंत असेल. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मार्केटमध्ये अशा अनेक म्युचल फंड योजना आहेत. ज्यांनी दीर्घ काळामध्ये चांगला परतावा दिला आहे.

News Title : Smart Investment in Mutual Fund SIP with 10 Rupees 04 September 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या