13 January 2025 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा

Top Mutual Fund

Top Mutual Fund | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेतील निवडणुकीच्या निकालांचे त्याचबरोबर जागतिक घडामोडींचे सांकेतिक परिणाम शेअर बाजारातील गुंतवणुकीवर पाहायला मिळाले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही शेअर बाजार चढ-उतारीवर अवलंबून होता.

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. यावर्षीच्या अहवालाप्रमाणे बीएसई स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 34% वाढ झाल्याची पाहायला मिळाली. त्याचबरोबर मिडकॅप इंडेक्सने देखील 29 टक्क्यांनी वाढ केली आहे. एवढेच नाही तर शेअर बाजारातील वाढीचे पडसाद इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये देखील पाहायला मिळाले आहेत. यावर्षीच्या अहवालामध्ये बऱ्याच इक्विटी फंडांनी भरघोस परतावा मिळवला आहे. एकूण 15 असे म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी 50 ते 64 टक्क्यांमध्ये परतावा मिळवला आहे.

50 ते 64 टक्क्यांचा परतावा मिळवणाऱ्या लिस्टमध्ये मिडकॅप सेक्टोरल फंड, ईएलएसएस, थिमॅटिक फंड, लार्ज कॅप, स्मॉल कॅप या फंडांनी सर्वाधिक परतावा मिळवला आहे. आणखीनही काही फंड आहेत ज्यांनी भरघोस कमाई करून दिली आहे.

वर्षभरात 50 टक्क्यांपेक्षा सर्वाधिक परतावा मिळवून देणारे फंड :

1. मोतीलाल ओसवाल लार्ज कॅप आणि मिडकॅप फंड : 52%
2. बंधन इन्फ्रास्ट्रक्चर फंड : 52.37%
3. मोतीलाल ओसवाल फ्लेक्सि कॅप फंड : 52.70%
4. एचडीएफसी फार्मा आणि हेल्थकेअर फंड : 53.56%
5. इन्वेस्को इंडिया फोकस्ड फंड : 53.73%
6. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड : 64%
7. एलआयसी म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चर फंड : 61%
8. एचडीएफसी डिफेन्स फंड : 58.67%
9. बंधन स्मॉल कॅप फंड : 58.46%
10. मोतीलाल ओसवाल इएलएसएस टॅक्स सेवर फंड : 57%

महत्त्वाचं :
बऱ्याच गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक तर करायची असते परंतु होणारा तोटा सहन करायचा नसतो. ज्या व्यक्तींना सर्वाधिक कमी जोखीम पत्करायचे असेल त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड अत्यंत फायद्याचे ठरू शकतात. म्युच्युअल फंडांमधील कोणतीही गुंतवणूक अनुभवी फंड व्यवस्थापकांच्या नियंत्रणात केली जाते. चांगल्या मार्गदर्शनामुळे शेअर बाजारातील म्युच्युअल फंडांचा कल वाढत्या दिशेने पाहायला मिळतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Top Mutual Fund Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Top Mutual fund(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x