22 January 2025 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

Union Mutual Fund | पैसा जलद वाढवायचा आहे? युनियन फंडाच्या या योजनेत 1000 रुपयांची SIP करा, संयमातून चमत्कारिक परतावा

Union mutual fund

Union Mutual Fund | युनियन म्युच्युअल फंड या प्रसिद्ध म्युच्युअल फंड हाऊस ने आपल्या गुंतवणूकदारांसाठी इक्विटी विभागात एक नवीन मल्टीकॅप फंड योजना सुरू केली आहे. इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये पैसे लावून दीर्घ काळात भरघोस परतावा कमावणे आणि मोठी संपत्ती निर्माण करणे हा या म्युचुअल फंड योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही म्युचुअल फंड स्कीम एक ओपन एंडेड स्कीम असून ती आपल्या गुंतवणूकदाराना हवे तेव्हा पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देते. हा NFO 28 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तुम्ही 12 डिसेंबर 2022 पर्यंत या NFO मध्ये गुंतवणूक करू शकता.

1,000 ने सुरू करा SIP गुंतवणूक :
युनियन म्युच्युअल फंड हाऊसने दिलेल्या माहितीच्या आधारे, गुंतवणुकदार युनियन मल्टीकॅप म्युचुअल फंडमध्ये किमान एकरकमी 1,000 आणि त्यानंतर 1 रुपयेच्या पटीत गुंतवणूक करू शकतो. त्याच वेळी, SIP द्वारे किमान 1,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करता येते. ही एक इक्विटी म्युचुअल फंड योजना आहे. गुंतवणूक सुरू केल्यावर 15 दिवसांच्या आत तुम्ही स्कीम रिडीम केल्यास तुम्हाला एक्झिट लोड म्हणून 1 टक्के चार्ज भरावा लागेल.

गुंतवणूकीची पात्रता :
युनियन म्युच्युअल फंड हाऊसच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना दीर्घकालीन गुंतवणुक करून मोठा परतावा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त स्कीम आहे. या इक्विटी म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक केल्यास लोकांना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. मल्टी कॅप म्युचुअल फंड योजनांमध्ये संबधित फंड हाऊसला इक्विटी मार्केट किमान 75 टक्के गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. त्याच वेळी त्यांना, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 25-25 टक्के गुंतवणूक करावी लागते. मल्टीकॅप्स म्युचुअल फंडमध्ये लार्जकॅप्स कंपनीमधील गुंतवणुकीचे वेटेज अधिक असते. तथापि म्युच्युअल फंड हाऊस मल्टी कॅप फंडांचे पुनर्संतुलन करू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Union mutual fund has Announced NFO of investors to invest in Multicap Mutual fund on o5 December 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x