15 November 2024 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

नागपूरमध्ये २ दिवस जनता कर्फ्यू , तुकाराम मुंढेंचा निर्णय

Curfew, Nagpur, Tukaram Mundhe

नागपूर, २४ जुलै : राज्यासह नागपूर शहरात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौर आणि आयुक्तांचे एक मत झाले आहे. लॉकडाऊनबाबत महापौरांनी बैठक बोलावलेली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र असून कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढील ४ दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असेही निश्चित करण्यात आले आहे.

मनपा मुख्यालयात आज अधिकारी आणि नागपूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी यांच्यासह इतर काहीजण उपस्थित होते. बैठकीत सर्वांच्या संमतीने हा जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. आज शहरात दिवसभर जनता कर्फ्यू संदर्भात सर्वत्र जनजागृती केली जाणार आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता २५ जुलै आणि २६ जुलै या दोन दिवासांमध्ये इतर सर्व व्यवहार बंद असणार आहे. जनता कर्फ्यूत विनाकारण बाहेर निघणाऱ्या नागरिकांना पोलीस विनंती करुन घरी परत पाठविणार आहेत. जनता कर्फ्यू नंतर २७ जुलै ते ३१ जुलै पर्यंत मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनतेत जाऊन लोकांना शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करुन पुन्हा जनजागृती करणार आहे.

 

News English Summary: Corona cases are on the rise in the capital Nagpur as well as other cities in Haryana. Against this backdrop, the Nagpur Municipal Corporation administration has decided to impose a 2-day public curfew in Nagpur from tomorrow.

News English Title: Curfew will be imposed for 2 days in Nagpur Tukaram Mundhe decision News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x