20 April 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

अजब | स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनं आणि मतदान करणाऱ्या फडणवीसांचा अखंड भारत'चा नारा

Devendra Fadnavis, Undivided India

नागपूर, २१ नोव्हेंबर: महाराष्ट्रात सध्या कराची स्वीट्सवरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने मिठाईच्या दुकानातील मालकाला दुकानाचे नाव पाकिस्तानी शहर असल्याने त्या नावातून ‘कराची’ हा शब्द काढून टाकण्यास सांगितले, यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, ‘अखंड भारत’ वर आमचा विश्वास आहे. मुंबईत सदर घटना घडल्यानंतर फडणवीस यांनी पीटीआयशी बोलताना हे वक्तव्य केले.

फडणवीस पुढे म्हणाले की, एक दिवस कराची हा भारताचा भाग असेल. ‘अखंड भारत’ (अविभाजित भारत) यावर आमचा विश्वास आहे आणि एक दिवस कराची भारताचा भाग होईल असा आमचा विश्वास आहे. गुरुवारी, शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्रे येथील प्रतिष्ठित कराची मिठाईच्या मालकाला दुकानाचे नाव बदलून भारतीय किंवा मराठी नाव देण्याचे आदेश दिले. मात्र, या घटनेनंतर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी ही पक्षाची “अधिकृत भूमिका” नसल्याचे स्पष्ट केले. राऊत म्हणाले, “कराची स्वीट्स आणि कराची बेकरी मुंबईत ६० वर्षांपासून आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. आता त्यांचे नाव बदलण्यात अर्थ नाही … ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.”

वास्तविक २०१४ मध्ये सत्ता आल्यावर बेळगाव प्रश्नावर म्हणजे अखंड महाराष्ट्रासाठी ताकदीने आणि आक्रमकपणे पुढे येताना कधी दिसलेच नाही. कर्नाटकात भाजपाची सत्ता असल्याने त्यांनी तशी हिम्मत देखील केली नसती. दुसरीकडे सत्तेत येण्यापूर्वी म्हणजे डिसेंबर २०१३ मध्ये नागपुरात तब्बल ६०० ठिकाणी बूथ लावून स्वतंत्र विदर्भासाठी मतदान घेण्यात आले होते आणि त्यात देवेंद्र फडणवीस सर्वात पुढे होते तसेच त्यांनी स्वतः ट्विट करून विदर्भातील लोकांना या संदर्भात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्र अखंड रहावा म्हणून प्रयन्त न करणारे आणि मराठी मातीचे दोन तुकडे करण्यासाठी पुढाकार घेणारे फडणवीस आज अखंड भारतावर बोलत आहेत हे हास्यास्पद म्हणावे लागेल.

काय होतं ते फडणवीसांचं नेमकं ट्विट;

 

News English Summary: In Maharashtra, politics is hot from Karachi Sweets. A Shiv Sena leader asked the owner of a sweet shop to remove the word ‘Karachi’ from the name of the shop as it is a Pakistani city. Asked about this, former Maharashtra Chief Minister and BJP leader Devendra Fadnavis said, “We believe in a united India.” Fadnavis made this statement while talking to PTI after the incident in Mumbai.

News English Title: Devendra Fadnavis talked about undivided India News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या