5 November 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

अजब! सावरकरांवर सडकून टीका करणारे भाजप आ. नितेश राणे आणि फडणवीस सभागृहात एकत्र?

MLA Nitesh Rane, Devendra Fadnavis

मुंबई: नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेवरुन शिवसेनेला सुनावले आहे. फडणवीस यांनी महापुरुषांचा आदर करण्यासंदर्भात सौदेबाजी सुरु आहे का असा सवाल शिवसेनेला केला आहे. यावरुन आता फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “आम्ही गांधी आणि नेहरूंना मानतो, म्हणून तुम्ही सावरकरांना माना?‬ ही कुठली सौदेबाजी आहे?‬,” असा सवाल फडणवीस यांनी शिवसेनाला केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरूद्ध विधान परिषदेत निंदाव्यंजक प्रस्ताव विरोधी पक्षांनी दाखल केला आहे. सदर प्रस्ताव स्वीकारण्यासारखा आहे अथवा नाही यावर सभापती निर्णय घेणार आहेत. परंतु, या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र भारतीय जनता पक्ष वेगळ्याच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, वीर सावरकरांवर सडकून टीका करणारे आमदार नितेश राणे आता त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सभागृहात महाविकास आघाडीला धारेवर धरणार आहेत आणि यापूर्वी देखील आमदार निलेश राणेंवर काँग्रेसने टीका करत भाजपाला खडे बोल सुनावत सावरकर प्रेम म्हणजे निव्वळ डोंगीपणा असल्याचं म्हटलं होतं.

 

Web Title:  MLA Nitesh Rane had Criticized Savarkar is Now in BJP Party during Winter Assembly Session

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x