महाविकास फोडाफोडी | नागपुरात अस्तित्व निर्माणासाठी शिवसेनेकडून मित्रपक्ष काँग्रेसला सुरुंग
नागपूर, २३ सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमेकांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडाफोडीवरून मोठं वादळ निर्माण झालं होतं. कारण सत्तेत एकत्र असूनदेखील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले होते. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादिसोबत बैठक करून वाद मिटवला होता आणि संबंधित नेत्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला होता.
आता तसाच प्रकार शिवसेनेनं केला असून त्यांनी नागपूर काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी केली आहे. नागपूर महापालिकेच्या राजकारणात सध्या काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख पक्ष आहे. पण नागपुरात शिवसेना महाविकासआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला सुरुंग लावत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकताच नागपुरातील शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला आहे.
आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षबांधणीसाठी जोरात प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावलं आहे. पण यामुळे नागपुरात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिंणगी पेटण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
News English Summary: In Nagpur, there is talk in the political circles that the Shiv Sena is undermining the Congress, an ally of the Mahavikasaghadi. Recently, 50 to 60 activists, including Angad Hindore, general secretary of the Nagpur City Congress Committee, have joined the Shiv Sena. Led by Shiv Sena liaison chief MLA Dushyant Chaturvedi, these Congress workers have taken up the Bhagva flag.
News English Title: Nagpur congress activist join Shivsena under leadership of MLA Dushyant Chaturvedi Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News