महत्वाच्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांच्या सर्व मागण्या फेटाळल्या | CRPC'च्या अनुषंगाने याचिका करण्याची सूचना
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला नाही. अनिल देशमुख यांच्या मागण्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता अनिल देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
25 वर्षे शिवसेना -भाजप एकत्र होती | तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले. तसेच शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे बंद पडतील. असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच त्यांनी उद्धव मुख्यमंत्र्यांकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन संशोधन संस्थेत (नागपूर) 155 जागांसाठी भरती
NRBMRI नागपूर भरती 2021. राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन संशोधन संस्था, नागपूर ने 155 विविध पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार आपला अर्ज विहित नमुन्यात 30 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी एनआरबीएमआरआय भारतीला सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात? | आरोपींची कबुली | पोलीस नोटीस पाठवणार
झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात झारखंड पोलिसांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. तर रांची येथील डीएसपी प्रभात रंजन यांनी याप्रकरणात शुक्रवारी आरोपी अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण प्रसाद यांची चौकशी केली. यावेळी या आरोपींनी महाराष्ट्रातील नेत्यांशी आपले संबंध असल्याची कबुली दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे
मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर जिल्ह्यातील फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले आहे. ही तीच संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहे. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी ईडी पथकामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी हिताची ठिबक सिंचन अनुदान योजना 2021-22 | कसा लाभ घ्याल - वाचा माहिती
सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर घटकामध्ये सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी अशा दोन उप घटकांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | झारखंड आमदार खरेदी प्रकरण | दिल्लीतील फुटेजनुसार बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांशी बैठक
झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशाची तरुणाई २०२४ मध्ये मोदी सरकार उलथवून लावेल - सुनील केदार
देशातील वाढत्या महागाईने लोकांचे नुकसान केले आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वाधिक युवकांचे नुकसान झाले आहे. देशातील तरुण हे बेरोजगार झाले आहे. यामुळे हे युथ येणाऱ्या 2024 निवडणुकीत हे भाजपचे सरकार उलथून लावतील आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला. ते नागपुरात संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हल्ला बोल आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांची सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सीबीआयने अनिल देशमुखप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात महाराष्ट्र सरकारला दिलासा मिळालेला नाही. एफआयआरमधील आक्षेपार्ह भाग वगळण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून अद्याप सुनावणी सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसेबाबत चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही | पण योग्यवेळी निर्णय घेऊ - फडणवीस
नागपूरला परतलेल्या फडणवीसांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईचा फोटो ट्विट करत सेनेला डिवचलं | नेटिझन्सकडून 'मामी हे नागपूर पहा' म्हणत व्हिडिओ, फोटोचा सपाटा
काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला. रेल्वे सेवेसोबतच रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूकही जवळ आल्यानं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
मोठी कारवाई | अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
महा बुलेट ट्रेन | नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण सुरू | शेतात जाऊन पाहणी | समृद्धी महामार्गालगतचा मार्ग
बहुचर्चित मुंबई- नाशिक- औरंगाबाद- नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणाचे काम देण्यात आलेल्या ‘तुला’ या एजन्सीचे प्रतिनिधी संभाव्य भूसंपादन हाेणाऱ्या शेतावर जाऊन तिथे सध्या नेमके काय आहे याची पाहणी करत आहेत. याआधी या मार्गासाठी विमानातून लिडार सर्वेक्षण झालेले आहे. समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधातही ईडीकडे तक्रार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता ईडीकडून उर्जामंत्री नितीन राऊत यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. नितीन राऊत यांनी अर्थिक गैरव्यवहार केला असल्याची तक्रार ईडीकडे दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार डॉ. तरुण परमार यांनी ईडीकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल - भास्कर जाधव
मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. याच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी चांगलाच समाचार घेतलाय. आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींनो, आता मोठ्या फसवणुकीला सज्ज राहा | फसवणूक झालेल्या धनगर समाजाच्या नेत्यांचा फडणवीसांच्या आश्वासनावरून हल्लाबोल
विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोटे बोलण्यात कोणी हात धरू शकणार नाही. त्यांनी सात वर्षांपुर्वी धनगर समाजाला १५ दिवसांत अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात आरक्षण मिळणारच नाही, याची व्यवस्था केली, शिवाय बुद्धीभेद करून धनगर समाजाच्या राजकीय जागृतीची चळवळ संपवली. बहुजनद्वेषी फडणवीसांचा डोळा आता ओबीसी समाजावर आहे. त्यांनी ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नवे आश्वासन दिले आहे. त्यांचा आवेश पाहता ओबीसी बांधवांनी नव्या फसवणुकीला तयार राहावे, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे. फडणवीसांच्या आश्वासनाला धनगर समाज ज्याप्रमाणे भुलला, त्याप्रमाणे ओबीसी समाजाने भुलून जाऊन नये, फडणवीसी डावपेचांपासून सावध राहावे, असे आवाहनही ढोणे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिसरी लाट | मुलांची काळजी घेण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या सूचना | नागपूर भाजपकडून लहान मुलं आंदोलनात
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
4 वर्षांपूर्वी -
पोलखोल | ओबीसी राजकीय आरक्षणात कपात करण्याचा अध्यादेश फडणवीस सरकारने २ ऑगस्ट २०१९ ला काढला होता
भाजपने सध्या ओबीसी आरक्षणावरून राज्यात आंदोलन उभी करत महाविकास आघाडीवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता फडणवीसांच्या काळातील मोठी पोलखोल झाली आहे. राज्यातल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने २ ऑगस्ट २०१९ रोजी घेतला होता आणि त्याबाबतचा अध्यादेश जारी केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राज्यात सरसकट 27 टक्के आरक्षण दिले जाते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असू नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ही चौकट पाळताना सरकारने 31 जुलैला अध्यादेश जारी करत ओबीसींच्या आरक्षणात कपात करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.
4 वर्षांपूर्वी -
ईडीने काल DCP डॉ. राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवला | आज अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी | काय कारण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.
4 वर्षांपूर्वी -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB