महत्वाच्या बातम्या
-
अफवा न पसरविण्याच्या मोदींच्या आवाहनाकडे भाजपच्या 'तुकडे-तुकडे' गॅंगचं दुर्लक्ष? सविस्तर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया सोमवारी ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य मुखपत्र चक्क हिंदी-गुजरातीत? सविस्तर वृत्त
महाराष्ट्र शासन सरकारी कामकाजात १०० टक्के मराठीचा वापर करण्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत आहे असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या चक्क हिंदी, गुजराथी आणि उर्दू आवृत्तींच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या अंकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आहे. यावेळी सचिव तथा महासंचालक सुरेश वांदिले देखील उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
सावरकरांना आदर्श न मानणारे आ. नितेश राणे संघ कार्यालयात? सर्व आमदारांचा अभ्यास वर्ग
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘शाळा’ घेतली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात असलेले भारतीय जनता पक्षाचे दोन्ही सभागृहातील आमदार स्मृती भवनमधील संघ अभ्यास वर्गाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यासारख्या ‘आयात’ नेत्यांचाही समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणार, फक्त बोंबलून प्रश्न मांडू नका
नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. ‘तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी तोफ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर डागली.
5 वर्षांपूर्वी -
विधिमंडळातील घोषणाबाजी पेक्षा मोदींकडे राज्याच्या हक्काचे १४,६०० कोटी मागा: जयंत पाटील
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाने विधानसभेत गदारोळ केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर, अर्थमंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही आमदारांमध्ये समन्वय साधला. त्यानंतर, यांनी फडणवीसांनाच प्रश्न विचारले.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर अधिवेशन: शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये जोरदार हाणामारी
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर: भाजपने विधानसभेत एकही जागा न दिलेल्या शहरांमध्ये शिवसेनेची पक्षबांधणी
शिवसेना काय आहे ते सगळ्या देशाला ठाऊक आहे, आम्ही कोणताही बुरखा पांघरलेला नाही. आम्ही धर्मांतर केलेले नाही. आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, अशी टीका करतानाच हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावणार्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव घेता दिला. त्या पक्षाने २०१४ साली युती तोडली होती. त्यानंतरही आम्ही हिंदूच होतो.शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत आपण कटीबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस गेले अन संवेदनशील गृहमंत्री येताच बंदोबस्तावरील पोलिसांना आयुक्तालयातर्फे १० रु. थाळी
नागपूर हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या पोलिसांच्या जेवणाचा बंदोबस्त गृहखात्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाने केला आहे. गोंडराजाचा पुतळा असलेल्या विधानसभा चौकात पोलिसांनी बुफे पद्धतीने जेवण वितरीत केले. हे जेवण अवघ्या १० रुपयात सर्व पोलिसांना देण्यात आले. जेवणाचा दर्जा कसा काय आहे हे पाहण्यासाठी खुद्द पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय जातीने हजर होते. त्यांनी पदार्थांची चव चाखून समाधान व्यक्त केले. त्यांनी स्वत: पोलिसांना जेवण वाढले देखील.
5 वर्षांपूर्वी -
हिंदूहृदयसम्राट सावरकर दैवत, हक्कभंग आला तरी सावरकरांवर बोलणार: देवेंद्र फडणवीस
शेतकरी प्रश्न आणि सावरकरांच्या मुद्द्यावर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं. भारतीय जनता पक्ष आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केल्यानंतर विधीमंडळ सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर येऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
जुन्या भाजप नेत्यांना डावलून मर्जीतल्या प्रवीण दरेकरांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत सर्वात आधी पंकजा मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, दरेकर यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. परंतु, त्यांना मागे सारत दरेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत बाजी मारली.
5 वर्षांपूर्वी -
ब्रिटिशांची ४ वेळा माफी मागणारे सावरकर तरुणांचे आदर्श होऊ शकत नाहीत; भाजप आ. राणेंचं ते ट्विट
नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजब! सावरकरांवर सडकून टीका करणारे भाजप आ. नितेश राणे आणि फडणवीस सभागृहात एकत्र?
नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारायची हे सेनेला ठरवायचे आहे: देवेंद्र फडणवीस
कालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आज मवाळ भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी किची लाचारी ठेवायची, सत्तेसाठी सौदेबाजीची आवश्यकता नाहीस अशा शब्दात काँग्रेसच माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावर मवाळ भूमिका घेतल्याची टीका करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता जारदार टीकास्त्र सोडलं.
5 वर्षांपूर्वी -
पंकजा व खडसेंवर थेट संघाकडून बोचरी टीका; भाजपातील मार्ग खडतर? सविस्तर वृत्त
भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंना शाब्दिक खडेबोल सुनावले असताना आता संघाशी संबंधित वृत्तपत्र तरुण भारत दैनिकाने पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे भाजपातून पंकजा मुंडे यांना बाहेरचा रास्ता दाखविण्यासाठी भाजपतील गल्ली ते दिल्लीतील नेते मंडळी पुढे सरसावली होती आणि त्यात थेट राष्ट्रीय स्वयंसेवक पक्षाने देखील भर घातल्याने त्यांचा भाजपातील मार्ग खडतर झाल्याची चर्चा रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं! समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट; एसीबी'कडून न्यायालयात शपथपत्र दाखल
महाविकास आघाडी सत्तेत येताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात ‘क्लीन चिट’ देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जबाबदारी ठरविण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस अॅन्ड इन्स्ट्रक्शनचा आधार घेतला आहे. (Former Deputy Chief Minister Ajit Pawar gets Clean Chit from ACB in Irrigation Scam)
5 वर्षांपूर्वी -
तारे फिरले! गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोपावरून माजी मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायलयाकडून २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी गुरूवारी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवले आहे.राज्यात एकीकडे महाविकासआघाडीचे सरकार येत असताना, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी हे समन्स पोहचले होते.
5 वर्षांपूर्वी -
आपसातील भांडणांमुळे दोघांचे नुकसान झाले पण अजून भांडणं बंद नाहीत: मोहन भागवत
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष-सेना यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, लहान मुलांचे प्रथम गुरू त्यांचे आई-वडील असतात. शाळेत जाण्यापूर्वी त्यांना प्राथमिक शिक्षण घरातूनच मिळतं.
5 वर्षांपूर्वी -
सध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नेते आरएसएस'च्या भेटीगाठी घेत असताना पवार शेतकऱ्यांच्या भेटीसाठी नागपुरात
कालच भाजपचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरला जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. एकाबाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना रडू कोसळत असताना नुकतेच पायउतार झालेले भाजप नेते अजून सत्तेच्या स्वप्नात मग्न असल्याचं उघड झालं होतं. मात्र आज स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यावर जाऊन अवकाळी पावसाने नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अडचणी समजून घेतल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS