महत्वाच्या बातम्या
-
ती जागा राम जन्मभूमीच, आता सरकारने कायदा बनवावा : मोहन भागवत
अयोध्येतील त्या विवादित जागेवर राम मंदिरच होते. आणि ती भूमी रामल्लाचीच आहे. कारण तिथे केलेल्या उत्खननात सुद्धा राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तसेच कोर्टाच्या प्रक्रियेला फार विलंब होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या विवादित जागेवर राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने तसा कायदा करावा, अशी थेट मागणी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हुंकार सभेत केली. तसेच आता राम मंदिराच्या कायद्यासाठी देशभरात जनजागृती करण्याचे थेट आवाहान सुद्धा आरएसएस प्रमुखांनी यांनी केले.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर भाजप: खून प्रकरणात जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला उपाध्यक्ष पद बहाल
एका हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नरेंद्र सिंह दिगवा उर्फ डल्लू सरदार याला भाजपाने उत्तर नागपूर मंडळाचा झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष पद बहाल केले आहे . विशेष म्हणजे शहरभर त्याच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक झळकावले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल ५५ वर्षानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल ५५ वर्षानंतर मुंबईत होणार आहे. तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिली ३ वर्षे म्हणजे १९६१ ते १९६३ या कालावधीत मुंबईत झाले होते. परंतु, त्यानंतर आता थेट २०१८ साली हे अधिवेशन मुंबईत होत आहे. असे असले तरी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरका याबाबत शेवटपर्यंत संभ्रम कायम होता. अखेर सोमवारपासून ते मुंबईतच सुरू होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
अभ्यंगस्नान, साहेब! अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला आहे पाठवू का?
आज नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. आज प्रथेनुसार या दिवशी केलं घरोघरी अभ्यंगस्नान केलं जातं. नेमका याच अभ्यंगस्नानाचा संदर्भ घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. सध्या राज्यात महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा एक ना अनेक विषयांवरून राज्य सरकारवर सामान्य जनता प्रचंड नाराज आहे आणि त्याचा सुद्धा अप्रत्यक्ष संदर्भ यात आहे.
6 वर्षांपूर्वी -
नरभक्षक टी-१ वाघीण ‘अव्नी’ अखेर ठार
कोणताही ठोस पुरावा नसताना थेट ‘नरभक्षक’ ठरवून टी-१ ‘अव्नी’ वाघिणीला शोधपथकाने अखेर ठार मारले आहे. या टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी मागील ४७ दिवसांपासून वनविभागाची शोध मोहीम सुरू होती. काल रात्री वाघिणीचा शोध घेणाऱ्या पथकावर हल्ला केल्याच्या बहाण्याने तिला गोळी झाडून ठार करण्यात आले असा आरोप प्राणिमित्रांनी केला आहे. बोराटीच्या जंगलातील नाल्यालागत राळेगण परिसरात हे हत्याकांड घडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नागपूर - मी टू मोहिमेला अमृता फडणवीस यांचा पाठिंबा
नागपूर – मी टू मोहिमेला अमृता फडणवीस यांचा पाठिंबा
6 वर्षांपूर्वी -
भारत-बंद वेळी स्वतःचा मतदारसंघ ठप्प करू न शकणाऱ्या निरुपमांची महाराष्ट्र-ठप्प करण्याची भाषा
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात रान पेटलेल असताना, त्याला संधी म्हणून निरुपम पाहत असावेत म्हणून नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलण्याची संधी मिळताच संजय निरुपम यांनी महाराष्ट्रात प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या मतदार संघात उत्तर भारतीयांनी साडेतीन लाखापेक्षा अधिक मतांनी नाकारलेले संजय निरुपम सध्या स्वतःची मतपेटी वाढविण्यासाठी आणि उत्तर भारतीयांचा मसीहा असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी मिळताच केविलवाणे प्रयत्नं करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातींना धमकी? गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे, मोदींनाही वाराणसीला जायचे आहे
चिमुकलीवर गुजरातमध्ये झालेल्या बलात्कारानंतर सध्या उत्तर भारतीयांना गुजरातमधून मारहाण करून हुसकावून लावण्यात येत आहे. अगदी गुजरात मध्ये पोलिसांना फ्लॅगमार्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या संजय निरुपम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तसेच गुजराती समाजाला अप्रत्यक्ष धमकावत आहेत अशी चर्चा राजकीय निरुपम यांच्या नागपूरमधील वक्तव्यावरून रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नागपुरात राजकीय परतीचा पाऊस? गडकरींच्या गावात भाजपचा ग्रामपंचायत निवडणुकीत धुव्वा
भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगलाच धोबीपछाड दिला आहे. नितीन गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा तसेच त्यांनी दत्तक घेतलेले ‘पाचगाव’ या दोन्ही ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेद्वारांनी बाजी मारली आहे. दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला काँग्रेसने धूळ चारली आहे. विशेष म्हणजे धापेवाडा येथे एकूण १७ पैकी भाजपच्या हाताला एकही जागा लागली नसून सर्वच उमेद्वारांना काँग्रेसने धूळ चारली आहे.
6 वर्षांपूर्वी -
२०१७ ऑक्टोबर : मुख्यमंत्री फडणवीस आणि दसो रिलायन्स ऐरोस्पेस लिमिटेड
२०१७ ऑक्टोबर : मुख्यमंत्री फडणवीस आणि दसो रिलायन्स ऐरोस्पेस लिमिटेड
6 वर्षांपूर्वी -
नागपूर - काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालिकेच्या महापौर कक्षात गोंधळ
नागपूर – काँग्रेस कार्यकर्त्यांचा पालिकेच्या महापौर कक्षात गोंधळ
6 वर्षांपूर्वी -
भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन व चारित्र्य अटलजींसारखं आहे का? गडकरींचा कार्यकर्त्यांना रोखठोक सवाल
सध्या भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन आणि चारित्र्य अटलजींसारखं आहे का? असा रोखठोक सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांना केला. पक्षाच्या कार्यक्रमात मला फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही अशा मुद्द्यांवर पक्षात खडाजंगी होते, असा सणसणीत टोला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लगावत सत्य परिस्थितीवर बोट ठेवलं.
6 वर्षांपूर्वी -
सेनेच्या १२ मंत्र्यांनी काहीच कामं केली नाही, त्यांचा राज्याला काहीच फायदा नाही: सेना आमदार बाळू धानोरकर
शिवसेनेचे वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी काल नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यात शिवसेनेच्या मंत्र्यांची अक्षरशः धिंडवडे काढले आहेत आणि पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव: शरद पवार
मराठा समाजच्या आंदोलकांनी हिंसा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेने आंदोलन करण्याला प्राधान्य द्यावे आणि मराठा व बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव हाणून पडावा असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकांमध्ये इतका असंतोष असताना भाजप निवडणुका जिंकतंच कसं? उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात असलेली एकूणच राजकीय परिस्थिती संप आणि आंदोलन तसेच जनतेतील असंतोष पाहता महाराष्ट्रातील महानगरपालिका,पंचायत, नगरपालिका अशा सगळ्या निवडणुका भाजप जिंकतंच कसं आणि मुख्यमंत्री लोकप्रिय असल्याचा दावा आपण करतातच कसा असा खडा सवाल शिवसेनेने सामना या मुखपत्रातून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, पंढरपुरात इंटरनेट बंद
मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
'एक देश, एक निवडणूक' अशक्य: मुख्य निवडणूक आयुक्त
काही महिन्यापासून वन नेशन वन ईलेक्शन’वर चर्चा रंगली असताना स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसे करायचे झाल्यास आधी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल तसेच ईव्हीएम’च्या दुप्पट म्हणजे तब्बल ४५ लाख मतदान यंत्र लागतील असं सांगत ‘एक देश, एक निवडणूक’ शक्य नसल्याचं कारण दिल आहे.
6 वर्षांपूर्वी -
संख्याबळ असलेले विरोधक नव्हे, तर संख्याबळ नसलेले राज ठाकरेच आगामी निवडणुकीत भाजपला उजवे ठरतील: सविस्तर
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध पोटनिवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आणि भाजपाची घोडदौड पाहता, त्यांच्या समोर आमदार, खासदार असं मोठं संख्याबळ असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष सुद्धा फिके पडताना दिसत आहेत. तर पदवीधर निवडणुकांचे निकाल हे जवळजवळ निश्चित असतात आणि त्या निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडणे अवघड आहे. परंतु पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने कोकणात चमत्कार केला तर नाशिकमध्ये ते गाफील राहिल्याने जागा गमवावी लागली होती.
6 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
6 वर्षांपूर्वी -
'आम्ही कागदी नव्हे तर खरे वाघ आहोत', शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला?
आज नागपूर कोराडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांचा संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला लगावला आहे. त्यापुढे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक मुद्यांवर अप्रत्यक्ष आणि बोचरी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News