15 November 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

फडणवीसांना नागपूर न्यायालयाकडून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. फडणवीस हे आज न्यायालयात उपस्थित झाला. १५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. नागपुरातील २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. यातील एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. सत्र न्यायालयाने याबाबत फडणवीसांना समन्स बजावला होता. त्यामुळे ते कोर्टात हजर होते.

फडणवीसांनी पुढे असे सांगितले की, ‘माझ्यावर कोणतेही वैयक्तीक गुन्हे नाहीत. ते फक्त आंदोलनाचे गुन्हे आहेत. त्याची नोंद मी निवडणूक शपथपत्रात केली होती. मी सर्व गोष्टी कोर्टासमोर मांडल्या आहेत. निश्चितपणे मला न्याय मिळेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, ‘हे असे गुन्हे नाहीत ज्यामुळे माझ्या निवडणुकीवर काही परिणाम होईल. माझ्यावरचे सर्व गुन्हे सामान्य जीवनामध्ये लोकांसाठी संघर्ष करण्यासाठी झाले आहेत. याच्या पाठीमागे कोण आहे ते योग्यवेळी बाहेर येईल, असे देखील फडणवीसांनी सांगितले.

फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात १९९६ ते १९९८ दरम्यानच्या दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची आज नागपूर न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला हजर राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार फडणवीस आज न्यायालयात हजर झाले. त्यांच्या वतीनं ऍडव्होकेट. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. तर सतीश उके यांनी विरोधात युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायालयानं फडणवीस यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला.

 

 

English summary: Story former Chief minister Devendra Fadnavis gets bail forgery and criminal defamation cases at Nagpur Court.

 

Web Title: Story Nagpur court grants Bail to former CM Devendra Fadnavis on personal bond of rupees 15000.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x