22 January 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे शिवसेनेच्या या नेत्याची थेट RSS'कडे तक्रार

Amruta Fadnavis, RSS, Shivsena

नागपूर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी पर्यावरणमंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून केलेल्या टीकेला शिवसेनेनंही तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी आपले गायनाचे छंद जोपासले नाहीत, असा सणसणीत टोला शिवसेनेनं अमृतांना हाणला होता.

बांगड्या घातल्या आहेत का? अशी टीका करणाऱ्या फडणवीस यांनी माफी मागावी म्हणणाऱ्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांना फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. “शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही,” अशा शब्दांमध्ये टीका करणाऱ्या फडणवीस यांच्यासंदर्भात ट्विट करणाऱ्या आदित्य यांना ट्विटवरुन अमृता फडणवीस यांनी टोला लगावला होता. त्यावर शिवसेनेकडून टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. वडिल मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गायनाचा छंद जोपासला नाही, असं म्हणत शिवसेनेनं अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

मात्र शिवसेनेचे नागपूरमधील नेते किशोर तिवारी भलतेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा असं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता. त्याचा निषेध करत किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी अनेक विषय नमूद केले आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनाही राजकीय आगपाखड करण्यापासून आवरा. देवेंद्र आणि अमृता फडणवीस जी टीका करत आहेत त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत, ते जवळ येणं आणखी कठीण होतं आहे. निवडणूक निकालानंतर जी युती होऊ शकली नाही आणि भाजपाला सरकार बाहेर जावं लागलं हे देवेंद्र फडणवीस यांच्या अरेरावीमुळे झालं. देवेंद्र फडणवीस यांचा अतिआत्मविश्वास त्यांना नडला. अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे अशोभनीय आहे. भारतीय संस्कृतीतील पती आणि पत्नीच्या संस्कृतीला धक्का देणारं आहे. अमृता फडणवीस यांना भाजपा हा पक्ष टेक ओव्हर करायचा आहे का?. अमित शाह, नितीन गडकरी यांच्या यांच्या पत्नी कुणावरही टीका करत नाहीत. सीतेने रावणाला शिव्या दिल्याचं ऐकिवात नाही जे काही करायचं ते राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी केलं. अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे २०२४ मध्ये भाजपाला नुकसान होऊ शकतं. असे अनेक मुद्दे त्यांनी पत्रात नमूद केले आहेत.

 

News English Summery: However, Shiv Sena leader Kishore Tiwari is seen to be very angry. Shiv Sena leader Kishore Tiwari has written a letter to Amrita Fadnavis, a political interventionist, to Bhaiyyaji Joshi, the government’s leader. Amrita Fadnavis had criticized Aditya Thackeray. Aditya Thackeray was mentioned by Amrita Fadnavis. This letter has been written by Kishore Tiwari protesting. He has mentioned several topics in it.

 

Web Title: Story Shivsena leader wrote letter to RSS against Amruta Fadnavis and Devendra Fadnavis.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x