कोरोना आपत्ती | नाशिकमध्ये 12 मे पासून 10 दिवसांचा कडक लॉकडाउन
नाशिक, १० मे | नाशिक जिल्ह्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 12 मे रोजी 12 वाजल्यापासून 22 मे पर्यंत 10 दिवस जिल्ह्यातील मार्केट पूर्णपणे बंद पाडले जाणार आहे. या लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.
- जिल्ह्यात बुधवारपासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार, सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत दूध विक्री सुरू राहील. याच कालावधीमध्ये भाजीपाला देखील विकता येईल. मात्र रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्यांना परवानगी राहणार नाही. ज्यांची दुकाने आहेत ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवू शकतील. हातगाडीवर फिरून भाजीपाला विक्री करणाऱ्यांना सुद्धा दुपारी बारा वाजेपर्यंतच विक्री करता येणार आहे.
- या व्यतिरिक्त जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये सर्व बांधकामे बंद राहतील. जेथे कामगारांना राहण्याची सोय आहे अशाच ठिकाणी बांधकामांना परवानगी असेल. 10 दिवसांच्या कडक लॉकडाउनमध्ये मजुरांची ने-आण करता येणार नाही.
- लॉकडाउन काळात सर्व बाजार समित्या बंद राहतील. पेट्रोल पंपांवर सुद्धा केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरवठा करणाऱ्यांनाच पेट्रोल दिले जाणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना तसे गणवेश, ओळखपत्र गळ्यात ठेवावे लागणार आहे.
- वैद्यकीय सेवेशी संबंधित सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. लॅब, रुग्णालये आणि मेडिकलवरील कामगारांना ओळखपत्र बाळगावे लागणार आहेत.
- या व्यतिरिक्त अत्यावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी सुरू राहील. विशेष म्हणजे, किराणा दुकाने सुद्धा केवळ होम डिलिव्हरी करू शकतील. लोकांना भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी सुद्धा बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी सकाळी 7 ते 12 अशी वेळ दिली आहे.
दरम्यान, दुसऱ्या लाटेमुळे देशात आणि राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरूवातीला नाईट कर्फ्यू व नंतर संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले. मात्र, त्यामुळे करोना रुग्णवाढीला ब्रेक लागला असला, तरी त्यामध्ये घट झालेली नाही. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाचा संर्सग पोहोचल्यानं चिंता वाढली आहे.
News English Summary: A 10-day strict lockdown has been announced in Nashik district against the backdrop of increasing number of patients. The market in the district will be closed for 10 days from 12 noon on May 12 to May 22. The lockdown will shut down all but essential goods and services. Nashik Municipal Commissioner Kailas Jadhav has taken this decision after a meeting held on Monday morning.
News English Title: A 10 day strict lockdown has been announced in Nashik district against the backdrop of increasing number of patients news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती