16 April 2025 8:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

नाशिकमध्ये लोटसचं ऑपरेशन | भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

BJP female activists, joins Shivsena party, Nashik, Sanjay Raut

नाशिक, १४ फेब्रुवारी: आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधले. भाजपच्या तब्बल 50 महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना इतर विषयांवर देखील भाष्य केलं. सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात आल्यासारखं वाटतंय, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. काल राष्ट्रवादीचे नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी भेट झाली. महापालिकेविषयी चर्चा झाली, ती इथे कशी सांगणार, असं राऊत म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर, आमचं ठरलंय, असा निर्धार देखील राऊतांनी व्यक्त केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत. राजभवनाचा वापर राजकारणासाठी होतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नाही. राज्यपाल आणि सरकारचं शीत युद्ध नाही तर खुलं युद्ध आहे, असंही राऊत म्हणाले.

 

News English Summary: The winds of change are blowing in the face of the upcoming Nashik Municipal Corporation elections. In the presence of Shiv Sena MP Sanjay Raut, activists of Bharatiya Janata Party Mahila Aghadi tied Shivbandhan. As many as 50 women BJP workers joined Shiv Sena.

News English Title: BJP female activists joins Shivsena party in Nashik in presence of Sanjay Raut news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या