5 November 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News
x

मनसे'नंतर वसंत गीते भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत; भुजबळांची भेट घेतली

BJP Leader Vasant Gite, ncp senior leader chhagan bhujbal, Nashik former Deputy Mayor Prathamesh Gite

नाशिक: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. ‘छगन भुजबळ यांना सदिच्छा दिल्या आणि त्यांचं स्वागत केलं. त्यांचे आशीर्वाद घेण्याकरीता भेट घेतली,’ अशी प्रतिक्रया वसंत गीते यांनी दिली आहे. तसंच यावेळी वसंत गीते यांनी भुजबळांवर चांगलीच स्तुतीसुमने उधळली.

‘छगन भुजबळ यांच्याशी माझं पक्ष विरहित नातं आहे. भुजबळ अनुभवी नेते आहेत. ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे,’ असं वसंत गीते यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर वसंत गीते यांनी भुजबळांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केल्यानंतर त्यांची भाजपात डोकेदुखी वाढली होती. कारण तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी नाशिकमध्ये बंडाचा झेंडा फडकवला सुरुवात केली होती. त्यावेळीच नाशिकमधील दोन माजी आमदार आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. त्यामध्ये वसंत गीते आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता असं म्हटलं गेलं. तर दुसरीकडे नाशिकमधील शिवसेनेचे ताकदवान नेते संतोष शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते. दरम्यान, वसंत गीते यांचे आमदार देवयानी फरांदे यांचे नाशिकमधील वैर सर्वश्रुत आहे आणि त्या पुन्हा आमदार झाल्याने त्यांची डाळ शिजणार नाही याचा त्यांना प्रत्यय आला आहे.

२०१४ मधील निवडणुकीत आयत्यावेळी अशीच मनसेची गोची करत समर्थकांची बैठक बोलावून अचानक पक्षाला दगा दिला होता. त्यावेळी मूळ कारण भाजपाची देशभर झालेली हवा हे कारण होतं. त्यानुसार त्यांनी मनसे सोडत भाजपमध्ये मोठ्या आशेने प्रवेश केला. मात्र मुलाला मिळालेलं उपमहापौर पद सोडल्यास त्यांच्या वाट्याला फारस काही आलं नाही. मात्र ५ वर्षांनंतर त्यांना काहीच हाती लागलं नसून, भाजपने त्यांना आश्वासनं देत खिळवून ठेवत आयत्यावेळी दगा दिल्याने ते भाजपाला राम राम करण्याच्या तयारीत असल्याने तडकाफडकी समर्थकांची बैठक बोलावली होती. कुठेच उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा तयारीत होते, मात्र निवडून येणं शक्य नसल्याने त्यांनी वेट अँड वॉच भूमिका स्वीकारली आणि राष्ट्रवादी सत्तेत बसताच भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

 

BJP Leader and Ex MLA from Nashik Vasant Gite Meets to NCP Senior Leader Chhagan Bhujbal

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(20)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x