5 November 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

फडणवीसांच्या दत्तक नाशिकमधील आरोग्यव्यवस्थेची पोलखोल | २०१७ मध्ये नाशिककरांना दिली होती मोठी वचनं

Nashik oxygen leak

नाशिक, २१ एप्रिल: नाशिकमध्ये महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने सर्वत्र हाहाकर माजला आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे अर्धा तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. याच अर्ध्या तासात तब्बल 22 जणांचा जीव एका झटक्यात गेला. यापैकी काही अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होते. तर काही रुग्णांमध्ये सुधारणा होत होत्या. काहींनी आपल्या नातेवाइकाला घरी घेऊन जाण्याची तयारी देखील केली होती. पण, अर्ध्या तासाने होत्याचे नव्हते केले.

नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.

रुग्णालयात पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या पाइपमधून गळतीला सुरुवात झाली. आता हे पाइप कापून दुरुस्त करण्यात आले. परंतु, दुरुस्तीच्या कालावधीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने काहींचा जीव गेला. रुग्णालयात 171 कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर होते. तर 67 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 22 जणांच्या मृत्यूनंतर आणखी काही रुग्णांची अवस्था गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या नाशिक महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे.

दरम्यान, नाशिक महानगरपालेकत भाजपाची सत्ता असली तरी भाजप नेत्यांनी जवाबदारीतून हात झटकले आहेत. अनेक भाजप नेत्यांनी केवळ चौकशी आणि वरवरच्या प्रतिक्रिया देऊन जवाबदारीतून हात झटकल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे २०१७ च्या सुरुवातीला नाशिक मी नाशिक दत्तक घेतोय अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील इथल्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरून पोलखोल सुरु झाली आहे. कारण आता याच गंभीर प्रकरणावर फडणवीस यांनी वरवरची प्रतिक्रिया देऊन हात झटकल्याचं पाहायला मिळतंय.

 

News English Summary: In Nashik, due to oxygen leakage in the Municipal Hospital, there is an outcry everywhere. The repair work disrupted the oxygen supply to the hospital for half an hour. In the same half hour, 22 people lost their lives in one shock. Some of these patients were in very critical condition. So some patients were improving. Some even planned to take their relatives home. But, it didn’t take half an hour.

News English Title: BJP leader Devendra Fadnavis had given many promises to Nashik during 2017 municipal corporation election news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x