मनसे अध्यक्षांभोवतीच्या लोकांवर गितेंना आजही अविश्वास | शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
नाशिक, ७ जानेवारी: नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेकांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. भाजपमधील एक गट नाराज असल्याने अनेक माजी आमदार तसेच नगरसेवक शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या संपर्कात आले आहेत. त्यातच माजी आमदार आणि भाजप नेते वसंत गिते यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केले होते. त्यामुळे गिते सुद्धा ‘मिसळी पे चर्चा’ करून भाजपाला राम राम ठोकण्याचा तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सोबत देखील वसंत गीते यांचं राजकीय वैमनस्य असल्याने त्यांचा भाजपातील मार्ग खडतर आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरुन देखील गीतेची उचलबांगडी करून कार्यकारिणी सदस्यपद दिल्याने वसंत गिते अत्यंत नाराज आहेत. त्यामुळे ‘मिसळ डिप्लोमसी’च्या निमित्ताने पक्षांतराचा विचार त्यांनी केला. त्यानंतर ते कार्यकर्ते, समर्थक यांच्याशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेतील असं वृत्त होतं. विशेष म्हणजे अनेक मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षादेश झुगारून गीतेच्या मिसळ पार्टीत हजर राहिल्याने नाशिक मध्ये मनसेला देखील नुकसान होणार हे निश्चित आहे. त्यात इतर पक्षाचे वरिष्ठ पक्ष विस्तारासाठी दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दौरे निश्चित होण्यासाठी ३-४ महिन्यांचा कालावधी घेत आहेत. परिणामी त्याच काळात कार्यकर्ते आणि पदाधिकारी इतर पक्षांचा गळाला लागत आहेत.
दरम्यान, वसंत गीते देखील पुन्हा त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतणार असल्याचं वृत्त आहे. मात्र मनसेत पुन्हा जाऊन स्वतःची राजकीय कोंडी आणि अडचण करून घेण्यात त्यांना काहीच रस नसल्याचं वृत्त आहे. परिणामी, मनसे अध्यक्षांच्या जवळील लोकांवर त्यांनी आजही अविश्वास दाखवत शिवसेनेत जाण्याच जवळपास निश्चित केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत देखील आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.
मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वसंत गिते यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षात परतण्याचं सूचवलं होतं. परंतु, मला ज्या तीन नेत्यांमुळे मनसेतून बाहेर पडावं लागलं, त्या नेत्यांसोबत काम करावं का? असा प्रश्न गिते यांनी विचारला. गिते यांचा रोख पूर्णपणे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याकडेच होता. नाशिकमध्ये मनसेला आपण वाढवलं, पक्षाचं काम मोठं केल. पण, भविष्यात आपल्याला स्पर्धक निर्माण होईल, म्हणून काही जणांनी मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडलं, असे यावेळी गिते यांनी म्हटले. तसेच, शिवसेना ही मला आईसमान आहे, असे सांगत शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेतही गिते यांनी यावेळी दिले. त्यामुळे, मनसेचे नेते निराश होऊन परतले.
News English Summary: Some MNS office bearers had suggested to go to Vasant Gite’s residence and return to the party. But, should I work with the three leaders who forced me out of the MNS? This question was asked by Gite. Gite’s cash was entirely with Bala Nandgaonkar, Nitin Sardesai and Avinash Abhyankar. We raised MNS in Nashik, made the work of the party bigger. “But in the future, we will have a competitor, so some people forced me to quit the party,” Gite said. Gite also hinted at joining Shiv Sena, saying that Shiv Sena is like ice to me. Therefore, the MNS leaders returned disappointed.
News English Title: BJP Leader Vasant More again rejoining Shivsena in presence of MP Sanjay Raut news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today