भाजप नेत्यांकडून पुन्हा तीच चूक | सानप यांच्या प्रवेशाने अनेक नगरसेवक पक्ष सोडण्याचा तयारीत
नाशिक, २२ डिसेंबर: नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Former Nashik MLA Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा भारतीय जनता पक्षाचा हात धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भारतीय जनता पक्ष प्रवेश केला. “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भारतीय जनता पक्षानेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भारतीय जनता पक्षामधील या गटाकडून विचारला जात आहे. पण सानपांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या विरोधापेक्षा पक्षातील विरोध आमदार सानप यांच्यासाठी अडचणीचे ठरले होते. सानप यांच्याविरुद्ध पक्षातील इच्छुकांचा एक मोठा गट त्यावेळी सक्रीय झाला होता, त्यांच्याकडून सानप यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाला होता. विशेष म्हणजे सानप यांना उमेदवारी देऊ नयेत म्हणून पक्षातील काही नेत्यांनी गिरीश महाजन यांची त्यावेळी भेट घेतली होती.
मागील पाच वर्षात भाजप पक्षातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना संधी न देता बाहेरील मंडळींच्या हातात नाशिकची सत्ता देण्यात आल्याचा आरोप सुद्धा त्यावेळी करण्यात आला होता. नाशिक पूर्व मतदारसंघात उमेदवार बदलण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून भाजपच्या गटात सुरु होती. परिणामी भाजपने स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली तत्कालीन आमदार सानप यांना तिकीट नाकारलं आणि बाळासाहेब सानप यांच्या राजकीय प्रवासाला उतरती कळा लागली होती. तेच चक्र आता पुन्हा सुरु झालं आहे.
News English Summary: The Bharatiya Janata Party (BJP) has also shown readiness to take Sanap to the party as it could benefit Sanap in the backdrop of Nashik Municipal Corporation elections. However, why is a leader who changes three parties in two years being allowed to join the party? Such a question is being raised by a section of the Bharatiya Janata Party. What if Sanap joins the party today and changes his party again after the municipal elections? This question is also being asked by this group in the Bharatiya Janata Party. But after Sanap’s entry into the party, the BJP’s headaches are now likely to increase. Because, many disgruntled corporators are expected to beat the BJP.
News English Title: BJP Nashik clashes after former MLA Balasaheb Sanap again joined BJP party news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER