22 February 2025 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार

Heavy Accident at Nashik

नाशिक: नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात होती. यादरम्यान, धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेल जवळ एसटी आणि रिक्षा या दोघांमध्ये जोरदार धडक झाली. बसचा टायर फुटल्याने बसने रिक्षाला धडक दिल्याची माहिती आहे. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस आणि रिक्षा दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सध्या वाहनांना विहिरीत काढण्याचं आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे.

या अपघातातील जखमींना ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयही सज्ज झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. नाशिकहून जिल्हा रूग्णालयाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत.

 

Web Title:  Bus and Rickshaw accident at Nashik 11 peoples death.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x