15 January 2025 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

धर्मा पाटलांच्या पत्नीचा सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा

धुळे : आम्हाला न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा धर्मा पाटलांच्या पत्नी सखूबाईंनी राज्यसरकारला दिला आहे. पुढे त्यांनी असे ही स्पष्ट केलं की राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन आम्हाला मान्य नसून योग्य तो मोबदला मिळावा अन्यथा आम्ही कुटुंब सामूहिक आत्महत्या करू असा सरकारला थेट इशाराच दिला.

आज महिला दीनाचे निम्मित साधून धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई त्यांच्या पतीच्या अस्थी कलश घेऊन मुलगा नरेंद्र पाटीलसोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आल्या होत्या.

राज्य सरकारने वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील कुटुंबीयांची जमीन संपादित केली आहे आणि त्यानिमित्ताने हतबल होऊन आणि न्याय मिळण्याच्या उद्देशाने शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात खेटा मारल्या होत्या. परंतु तिथे ही न्याय मिळत नासा याने शेवटी त्यांनी जानेवारी महिन्यात मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्या केली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

त्या संपूर्ण घटनेनंतर दीड महिना अधिक उलटून गेला तरी शासन दरबारी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नसल्याच्या कारणाने त्या त्यांच्या मुलासोबत निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. परंतु धुळ्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे उपलब्ध नसल्याने अखेर त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांच्याकडे निवेदन सोपविले आणि राज्य शासनाच्या ढिम्म कारभाराचे राग व्यक्त करून वाभाडे काढले.

माझे पती धर्मा पाटील यांनी शासन दरबारी न्याय मागण्यासाठी गेले आणि आपला प्राण गमावला हे सांगताना सखुबाई यांना अश्रू अनावर झाले. तसेच राज्य सरकारने दिलेली ४८ लाखाची मदत देखील मान्य नसल्याचे सांगत योग्य मोबदला न दिल्यास सामूहिक आत्महत्या करू असा इशाराच राज्य सरकारला दिला आहे.

हॅशटॅग्स

#Dharma Patil Suicide(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x